LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
निलकंठ मास्तर

निलकंठ मास्तर

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

देशप्रेमाबरोबरचं देशभक्तांच्या मनात रूजलेली प्रेमभावना या विषयावर भाष्य करणारा अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड प्रस्तुत आगामी चित्रपट ‘निळकंठ मास्तर’… मेघमाला बलभिम पठारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या तरूणाच्या आयुष्यात प्रेमाची लागलेली चाहूल… या सुंदर नात्याची चित्रपटातून उलगडत जाणारी घडी गजेंद्र अहिरेंनी उत्तम बसवली आहे. चित्रपटाचा गाभा ओळखून त्या काळातलं संगीत देण्याचं शिवधनुष्य अजय-अतुल यांनी लिलया पेललं आहे.

विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, ओंकार गोवर्धन, पूजा सावंत, नेहा महाजन, प्रदिप वेलणकर, अमिता खोपकर, राहुल सोलापूरकर, मंगेश देसाई आणि इतर कलावंतही आहेत. अजय-अतुल यांचं संगीत दिग्दर्शन आणि गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन लाभलेला ‘निळकंठ मास्तर’ येत्या 7 ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

  • प्रस्तुती तिथी: 07 August 2015
  • निर्माता: मेघमाला बालाभिम पठारे (अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड)
  • दिग्दर्शक: गजेंद्र अहिरे.
  • कथा आणि पटकथा: गजेंद्र अहिरे.
  • गीतकार: गजेंद्र अहिरे.
  • गायक/गायिका: श्रेया घोषाल, जावेद अली, अजय गोगावले, आनंदी जोशी आणि आदित्य मोडक.
  • संगीत: अजय-अतुल.
  • भुमिका आणि पात्र:

    विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, ओंकार गोवर्धन, पूजा सावंत, नेहा महाजन, प्रदिप वेलणकर, अमिता खोपकर, राहुल सोलापूरकर, मंगेश देसाई, पी. डी. कुलकर्णी. 

कथानक

या चित्रपटात 'स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान करणा-या तरूणाच्या आयुष्यात प्रेमाची लागलेली चाहूल' रेखाटण्यात आली आहे. देशासाठी झटणा-या तरुणाईचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी