LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
पन्हाळा

पन्हाळा

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

‘पन्हाळा’ हा ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा असलेला गडकिल्ला. त्याची वैशिष्ठ्य तिथे जाणा-या अनेक पर्यकांना नेहमीच भूरळ घालत आलीयत. पण अभिनेता आणि फिल्ममेकर नागेश भोसले यांनाही या ‘पन्हाळा’ गडाच्या सृष्टीसौदर्याने, गूढतेने झपाटून टाकले. आणि त्यांनी ‘पन्हाळा’ हा चित्रपटच निर्माण केला आहे.

पन्हाळा हा जेवढा गुढ आहे, तेवढीच गुढता ब-याचदा मानवी नातेसंबंधांमध्ये असते. जसजसे आपण गढकिल्यात गेल्यावर त्याचं सौंदर्य आपल्यासमोर खुलू लागते. तशीच नातीही असतात. आणि पन्हाळ्याच्या साक्षीने तिथे पर्यटनासाठी येणा-या दोन जोडप्यांमधले नातेसंबंध या चित्रपटातून फिल्ममेकर नागेश भोसले उलगडून दाखवणार आहेत.

नागेश भोसले निर्मित आणि दिग्दर्शित पन्हाळा या चित्रपटात नागेश भोसले स्वत: मुख्य भूमिकेत असणारच आहेत. पण त्याचसोबत मकरंद देशपांडे, अमृता संत, समिधा गुरू आणि संग्राम साळवी यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'पन्हाळा'विषयी एका ओळीत सांगायचे झाले तर माणूस एकाच वेळी दोन प्रकारच्या लढाया लढत असतो. एक लढाई त्याची बाह्यजगाशी असते, तर एक लढाई स्वतःशी असते. हे या चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र आहे.

  • प्रस्तुती तिथी: 24 July 2015
  • निर्माता: नागेश भोसले, लीना देशमुख
  • दिग्दर्शक: नागेश भोसले
  • लेखक: विद्यासागर अध्यापक, अरविंद जगताप, उमेश पडळकर आणि विलास पडळकर.
  • भुमिका: मकरंद देशपांडे, संग्राम साळवी, समिधा गुरू, अमृता संत, नागेश भोसले.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी