LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
स्लॅमबुक

स्लॅमबुक

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, लव्हस्टोरीच्या नव्या प्रवाहातील संगीतमय ‘स्लॅमबुक’

प्रस्तावना

आजच्या हायस्पीड थ्रीजी इंटरनेटच्या जमान्यातील तरुणाईचे प्रेमाची कथा निराळी आहे. इंटरनेटवर भेटणे, ओळख करून घेणे आणि नंतर प्रत्यक्ष भेटणे अशा त-हेने तरुण-तरुणींचे प्रेम फुलताना दिसतेय. परंतु, साधा लँलाईनचा फोन होता तेव्हाच्या म्हणजे साधारण सन २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात ‘स्लॅमबुक’ या आगामी मराठी चित्रपटाची प्रेमकथा फुलते. पूर्वी स्लॉमबुक ही संकल्पना अतिशय लोकप्रिय होती. म्हणून या स्लॅमबुकच्या आधारेच खुलणारी ही प्रेमकथा दिग्दर्शक ऋतुराज धालगडे यांनी रूपेरी पडद्यावर साकारली आहे. शंतनू रांगणेकर आणि रितिका श्रोत्री ही नवी टीनएजर जोडी मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टीनएज लव्हस्टोरी पडद्यावर साकारण्यासाठी निर्माते सुरेखा धालगडे, ऋतुराज धालगडे यांच्यासह सहनिर्माते म्हणून छाया म्हात्रे, रोहित म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. आजच्या काळातील नव्या मराठी लव्हस्टोरी चित्रपटांच्या प्रवाहातील हा चित्रपट असून शंतनू रांगणेकर आणि रितिका श्रोत्री ही नवी जोडी या चित्रपटाद्वारे मराठी प्रेक्षकांसमोर अवतरणार आहे.

दोन अल्लड वयातील मुलामुलीची प्रेमकथा आणि या मोरपंखी प्रेमकथेला साजेसे संगीत हा या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. मालिका तसेच चित्रपटातून गाजत असलेल्या अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिच्या लेखणीतून उतरलेले ‘प्रेमात मी’ हे प्रेमगीत या चित्रपटात आहे. शुभांकर यांच्या संगीताने नटलेले हे गाणे शुभांकर आणि सोनिया मुंढे यांनी गायले आहे. ऋतुराज धालगडे यांच्या कथा-पटकथेला साजेसे प्रभावी संवाद लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.

त्याशिवाय दिलीप प्रभावळकर, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, माधवी सोमण, कुशल बद्रिके, सुप्रिया पाठारे, अभिजीत चव्हाण, योगेश शिरसाठ, श्रुती मराठे अशा एकाहून एक सरस आणि लोकप्रिय कलावंतांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. विलास नरवडे पाटील, चंद्रकांत साळुंके हे कार्यकारी निर्माते आहेत. रोमॉण्टिक टीनएज लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाची गीते विशाल राणे, स्पृहा जोशी यांनी लिहिली असून शुभांकर यांच्या संगीतबद्ध केली आहेत.

आनंद पांडे यांचे छायालेखन असलेल्या या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी रोहित म्हात्रे यांनी पेलली आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे, मोरया या गणपतीवरील खास गाण्यात झळकणार आहे. वैशाली सामंत यांनी गायलेल्या या गाण्याची शब्दरचना विशाल राणे यांची आहे. या संगीतमय प्रेमकथेतील गाणी शुभांकर, विशाल, रसिक, सागर, सिधान, प्रशांत, जगदीश अशा निरनिराळ्या संगीतकारांची संगीतबद्ध केली असून रसिक मेटांगळे, हृषिकेश रानडे यांनी गायली आहेत.

 • प्रस्तुती तिथी: 28 August 2015
 • निर्माता: सुरेखा धालगडे, ऋतुराज धालगडे
 • दिग्दर्शक: ऋतुराज धालगडे
 • कथा आणि पटकथा: ऋतुराज धालगडे
 • गीतकार: विशाल राणे, स्पृहा जोशी
 • गायक/गायिका: वैशाली सामंत, रसिक मेटांगळे, हृषिकेश रानडे, शुभांकर आणि सोनिया मुंढे
 • संगीत: शुभांकर, विशाल, रसिक, सागर, सिधान, प्रशांत, जगदीश
 • भुमिका आणि पात्र:

  शंतनू रांगणेकर आणि रितिका श्रोत्री, दिलीप प्रभावळकर, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, माधवी सोमण, कुशल बद्रिके, सुप्रिया पाठारे, अभिजीत चव्हाण, योगेश शिरसाठ, श्रुती मराठे.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी