LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
ते आठ दिवस

ते आठ दिवस

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

हिंदीबरोबरच ‘अबोली’ तर काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रिटा’ या चित्रपटात रेणुका दिसली होती. आता रेणुका पुन्हा एकदा ‘ते आठ दिवस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. शशांक केवले लिखित आणि शाम धानोरकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शेखर प्रधान, श्वेता जाधव, किशोर धारगळकर यांनी केली आहे.

करिअरच्या ध्यासापायी आपल्या अवघ्या एक वर्षांच्या मुलीला सोडून अमेरिकेला गेलेली तरुणी ते मुलीच्या लग्नासाठी मायदेशी परतल्यानंतर निर्माण झालेल्या एका समस्येत घरच्यांचा विरोध पत्करून मुलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी आई, अशी भूमिका रेणुका या चित्रपटात साकारत आहे. हा चित्रपट आठ दिवसात घडणाऱ्या घडामोडींवर बेतलेला आहे. रेणुकासह चित्रपटात तुषार दळवी, अविनाश मसुरेकर, सुहास परांजपे आदी मुख्य भूमिकेत आहेत.

 • प्रस्तुती तिथी: 30 October 2015
 • निर्माता: शेखर प्रधान, श्वेता जाधव, किशोर धारगळकर ( Supremo Entertainment )
 • दिग्दर्शक: शाम धानोरकर
 • कथा:
 • कथा आणि पटकथा: शशांक केवले.
 • गीतकार: सौमित्र
 • गायक/गायिका: शैलजा सुब्रामन्यम.
 • संगीत: विकास भाटवडेकर, पंकज पडघम.
 • भुमिका आणि पात्र:

  तुषार दळवी, अविनाश मसुरेकर, सुहास परांजपे, रेनुका शहाणे, आरोह वेलणकर, दिपाली मुचारीकर, सुनील जोशी, अतुल तोडणकर, मीना सोनावणे, अभिलाषा पाटील, अभिषेक देशमुख, आशय कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी, रमेश सोलंकी आणि आशितोष गायकवाड.

कथानक

ही गोष्ट आहे एका अशा स्त्रीची जी अठरा वर्षानंतर परत येते, आपल्या मुलीच्या लग्नासाठी …. एका अशा स्त्रीची जी आपल्या नवऱ्याची, आपल्या मुलीची, आपल्या कुटुंबाची क्षमा मागून पुन्हा त्यांच्यासोबत राहण्यास आली आहे.

आणि ही गोष्ट अशा एका मुलीची आहे, जी अचानक लग्नाच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तिच्या मनात आपल्या भविष्याविषयी असंख्य प्रश्न आहेत. तिचं मन फक्त तिच्या आईलाच कळतं आणि ती आपल्या मुलीची मदत करण्याचा एक धाडसी निर्णय घेते. पण असं करताना तिला पुन्हा एकदा कुटुंब गमवायचं नसतं ही गोष्ट आहे त्या स्त्रीची .. त्या आईची.. त्या पत्नीची .. जी अठरा वर्षानंतर परत येऊन सुद्धा सगळ्यांचं मन जिंकते. ही गोष्ट आहे एका कुटूंबाच्या पुनर्मिलनाची.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी