Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
प्रत्येक वडिलासाठी आपली मुलगी ही ‘राजकन्या’ असते आणि मुलीसाठी आपले वडिल हे ‘सुपरहिरो’ असतात. आपले सर्व लाड पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे हट्ट धरता येतो अशी हक्काची व्यक्ती म्हणजे वडिल.
प्रत्येक वडिलासाठी आपली मुलगी ही ‘राजकन्या’ असते आणि मुलीसाठी आपले वडिल हे ‘सुपरहिरो’ असतात. आपले सर्व लाड पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे हट्ट धरता येतो अशी हक्काची व्यक्ती म्हणजे वडिल हे मुलींना माहित असतं. ज्यांचं बोट धरून इवलीशी पाऊलं चालायचं शिकतात ते वडिलच असतात, पहिल्यांदा सायकल शिकतांना मागे आधार देणारा आणि आत्मविश्वास देणारा हात वडिलांचाच असतो.
‘असे हे कन्यादान’ची कथा आहे सदाशिव किर्तने (शरद पोंक्षे) या अतिशय प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिका-याची आणि त्याच्या कुटुंबाची. मुंबईत राहणारे किर्तने हे महानगरपालिकेत उच्च पदावर आहेत. कार्यालयात आपल्या कडक शिस्तीमुळे सर्व कर्मचा-यांमध्ये त्यांचा दरारा आहे. खोटं बोलणं, भ्रष्टाचार, लाचखोरी, वशिलेबाजी या गोष्टींची किर्तनेंना भयंकर चीड आहे. जी शिस्त कार्यालयात तिच घरातही. पत्नी उमा, मुलगी गायत्री आणि मुलगा तेजस असा किर्तनेंचा परिवार. उमा ही गृहीणी तर तेजस आणि गायत्री दोघांचही शिक्षण सुरू आहे. गायत्री कॉलेजला जाते तिला नृत्याची आवड आहे. गायत्री आणि सदाशिवरावांचं नातं खूप हळवं आहे.
सदाशिवराव जेवढे शिस्तप्रिय आहेत तेवढेच प्रेमळ वडिलही आहेत. गायत्रीला काय हवंय नकोय, तिला काय आवडतं काय नाही, तिचे छंद, तिचे हट्ट या सगळ्या गोष्टी त्यांना नीट माहित आहेत. गायत्रीचे सर्व हट्ट आणि लाडही ते पुरवतात पण त्याचीही त्यांची एक वेगळी पद्धत आहेत. मुलांनी एखादी गोष्ट मागितल्यास ती लगेच दिल्यावर त्याची किंमत उरत नाही त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी द्याव्या असं त्यांचं मत… खरं तर त्यांचे संस्कार आणि शिस्तीमुळे गायत्रीनेही कधीच कोणती वायफळ किंवा अनावश्यक गोष्ट त्यांच्याकडे मागितली नाही. आपल्या वडिलाबद्दल तिच्या मनात प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते दोघे जरी एकमेकांचे मित्र नसले तरी आपल्या कोणत्याही मित्र मैत्रिणीपेक्षा आपले बाबा आपल्याला चांगलं समजून घेतात असा विश्वास गायत्रीला आहे. बाबांचा आनंद तोच आपला आनंद असं गायत्री मानते. तिच्यावर आणि तिने घेतलेल्या सर्व निर्णयांवर बाबांनाही विश्वास आहे. आपला प्रत्येक निर्णय ती बाबांनाच विचारून घेते. या परिस्थितीत गायत्रीच्या आयुष्यात कार्तिक येतो. गायत्री कॉलेजच्या एका स्पर्धेत नृत्य करताना कार्तिक तिला बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. स्वभावाने “हॅपी गो लकी” असलेला कार्तिक खरं तर मोठा उद्योगपती आहे. त्याचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. पहिल्याच भेटीत गायत्रीच्या प्रेमात पडलेला कार्तिक तिला लग्नाची मागणी घालतो आणि तिथुन तिचं आयुष्य नव्या वळणावर येतं त्याचीच कथा म्हणजे ‘असे हे कन्यादान’ ही मालिका.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.
Comments (1)
अविनाश कुलकर्णी
चांगला देखणा उद्योग पति तिच्यावर मरत आहे..
अन हि याव टॅव करत माज दाखवत असते..
दुसरे हे चिरंजिव स्वताला सचिन समजतात क्रिकेट मधले..
यांचा माज निराळाच.."आम्हि किर्तने " आहोत असा माज आहे बहिण भावाना..
वडिलांची किर्ति सांगे तो महामुर्ख येक..हे वचन बहुदा ऐकले नसावे त्यानी
या मालिकेमधून वडील मुलगी या नात्यातील काही वेगळे , भावूक आणी निराळे ऋणानुबंध पहावयास मिळेल अशी अपेक्षा होती आणी ज्या पद्दतीत जाहिरात केली होती त्या अपेक्षा निश्चित पणे वाढलेल्या होत्या . परंतु प्रत्येक्षात मात्र खूपच निराशा झाली कारण हळुवार भावनिक नात्यांची गुंफण न दाखवता वडिलांविषयी एक आदरयुक्त भीती, निर्णयाची बहुतांशी भिस्त ही वडिलांवर पूर्णपणे अवलंबून असल्यासारखी आणी आपल्या मनाचा कौल हि आपल्या वडिलांना सांगायची हिम्मत नसलेली त्यामुळे हे वडील मुलीचे नातेच मुळात संभ्रमात टाकणारे आहे.
reply