Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
चिराग पाटील 'येक नंबर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. चिराग या मालिकेत रावडी मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रत्यक्षात मृदू स्वभावाचा असलेल्या चिरागला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली, असं मालिकेचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितलं. त्यांनी गुरु पौर्णिमा आणि भारतीय या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं.
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, खेळाडूचा मुलगा खेळाडू, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता, असं चित्र अनेकदा पाहायला मिळतं. पण एका क्रिकेटरचा मुलगा आता क्रिकेटर न होता अभिनेता झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आता छोट्या स्क्रीनवर नवी इनिंग सुरु करणार आहे.
चिराग पाटील 'येक नंबर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. चिराग या मालिकेत रावडी मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रत्यक्षात मृदू स्वभावाचा असलेल्या चिरागला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली, असं मालिकेचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितलं. त्यांनी गुरु पौर्णिमा आणि भारतीय या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. चिरागने यापूर्वी हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण मालिकेचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. बॅट्समन संदीप पाटील यांचा मुलगा अभिनयात किती स्कोअर करतो ते आता बघूया.
22 जून रोजी स्टार प्रवाह या चॅनलवर ही मालिका सुरु होत आहे. अनेक तरुणांमधून चिरागची निवड करण्यात आली आहे. 'येक नंबर' ही एक लव्ह स्टोरी असून देवा आणि वेदा अशी मुख्य पात्रांची नावं आहेत.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.