Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचं बालपण गेलं.
डॉ. आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रांतील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे.
दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आहे. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गोलपीठा भागात अत्यंत गरीबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.
१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक), आणि प्रियदर्शीनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले.\r\nसाठोत्तरी मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली कवी. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिक दृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक. आंबेडकरी चळवळीशी विशेषत: दलित चळवळीशी बांधिलकी. लिखाणावर लघुनियतकालिके, मनोहर ओक, त्याचबरोबर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो.
पुस्तके-कविता संग्रह :- गोलपीठा (१९७२), खेळ (१९८३), मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५), तुही यत्ता कंची (१९८१), या सत्तेत जीव रमत नाही (१९९५), मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात, तुझे बोट धरुन चाललो आहे, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६), गांडू बगीचा (१९८६).
नाटक :- अंधार यात्रा कादंबरी:- हाडकी हाडवळा, निगेटिव स्पेस्, इतर ,आंधळे शतक ।- मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
पुरस्कार :- बुद्ध रोहिदास विचार गौरव - इ.स. २००९, साहित्य जीवन गौरव पुरस्कार २००४ [२], पद्मश्री पुरस्कार
साठोत्तरी मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ याचं आज दिनांक १५ जानेवारी २०१४ ला निधन झालंय. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही काळापासून ढसाळ यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
’मराठी विश्व’ व्दारा नामदेव ढसाळांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही आपली श्रद्धांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या ’अभिप्राय द्या’ टाईप करा तुमच्या भावना... द्या ढसाळांना श्रद्धांजली..
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.