LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
आठवणी भाग १

आठवणी भाग १

0.0/5 rating (0 votes)

आठवणी (लघुकथा) चार भागांत लिहायचं ठरवलं. आज पहिला भाग आपल्या हातांत देतांना मनस्विनीला अतिशय आनंद होतं आहे. 'अनुभूति' काव्य संग्रहानंतर इतक्या लवकर हे दुसरे ebook प्रसिद्ध करतांना मनाला एक वेगळेच समाधान मिळत आहे. पुढील भाग ही माझ्या हातून लवकर पूर्ण व्हावेत ही इच्छा!

आठवण १,२,३,४ सर्वच छोट्या छोट्या कथा आहेत. प्रत्येक कथा 'आठवणी'च्या रूपांत आहे. मनस्विनी प्रत्येक कथेतील मुख्य व्यक्ती (narrator) म्हणून 'मी'च्या भूमिकेत वावरते आणि वाचकांना गोड फ़सवते. वाचकाला हेच मनस्विनीचं खरं आयुष्य असावं असं वाटतं. प्रत्यक्षात 'मी' होण्याचं वैशिष्ट्य हाच या आठवणींचा केंद्रबिंदू आहे.

प्रायमरी शाळेतील प्युनपासून सुरुवात होणारी आठवण एका जबाबदार तरुणीच्या, व्यवहारी जगाच्या ओळखीपर्यंत अगदी अलगद, शांत नि सरळसोट मार्गाने पुढे सरकते. तरीही गोष्टींमध्ये link आहे. शिक्षिकेच्या भूमिकेतून ती विराणी, वीरेंद्र अशा मुला मुलींकडे बघते तर लग्नाच्या वाढलेल्या वयामुळे समाजातील अशा मुलींच्या अडचणी ती सांगते. समाज स्त्रियांकडे, विशेषत: समाज-चाकोरीपासून दूर गेलेल्या किंवा घालवल्या गेलेल्या मुला मुलींची भूमिका ती निभावते.

विविध नोकऱ्यातील ठिकाणांपासून व्यक्तीरेखांपर्यंतची शब्दचित्रे या संग्रहात दिसतात. साठ सत्तर वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतचे विवध क्षेत्रांतील, अनेकविध गोष्टी ती 'मी' या व्यक्तिरेखेभोवती गुंफते. पूर्वीच्या सामाजिक कल्पना, त्याला अनुसरून असलेल्या रिती, मुलांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, घराण्याची परंपरा आणि त्यांचा विपरीत परिणाम भोगणारी त्यांचीच मुलं पाहिली की आज हैराण व्ह्यायला होतं. आई वडीलांच्या संसाराला हातभार लावणं आणि त्यागीपाणाची मूर्ती असणं गृहीत धरलं जायचं. पण याबद्दल मतप्रदर्शन करून ती समाज कसा घडला एव्हढच सांगू शकते .

गणपती उत्सव, आंब्यांचं साम्राज्य, रोजची गोष्ट या कथा समाजातील चांगल्या वाईट प्रथा दाखवतात. एकत्र कुटुंबातील आत्या हे खास अधिकारी व्यक्तीचं चित्र रेखाटते. मुलींच्या शाळांतील प्रगती 'लेझीम स्पर्धा' मध्ये दाखवते. 'बक्षीस समारंभ' मध्ये श्रीमंत प्रसिद्ध बाप किंवा नवरा असणाऱ्या (backing वाल्या) मुलींना मिळणारी खास वागणुकीन वशिला नसलेल्या 'मी' वर होणाऱ्या अन्यायाची तिला चीड येते. ती जिद्दीने पदव्या तर मिळवते पण त्या पदव्यांचा तिला फायदा मिळतो कां? थोडक्यात योग्य वयात, ज्या त्या वेळेस, जे ते एखाद्याला मिळणं किती जरूर आहे, हे वंचित मनस्विनी सांगते.

स्त्रीजात पृथ्वीवर आली तेव्हा पासूनच अधिकार-कनक-कांता हेच समीकरण असण्याची मनस्विनीची मनोधारणा चूक वाटत नाही. पूर्वी हे होतं नि आजही आहे. फक्त expression च्या तऱ्हा वेगळ्या, भाषा वेगळी, प्रकार वेगळे. एव्हढेच!

वैशिष्ट्य

  • लेखक: मनस्विनी
  • प्रकाशक: स्मशवर्डस
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: १४४१० शब्द
  • ISBN-10:
  • ISBN-13: 9781310663802
  • टिचक्या: 427

संबंधित पुस्तके