LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
अधांतरी

अधांतरी

5.0/5 rating 1 vote

स्त्री आणि पुरुष… त्यांच्यामध्ये निर्माण होणार मैत्रीचं नात… कधी फक्त असणार शारीरिकआकर्षण तर कधी या शारीरिक आकर्षणातून होणारी भावनिक गुंतवणूक… आणि या भावनिक गुंतवणुकीपायी आयुष्याची होणारी असह्य फरपट…. या साऱ्या भावनिक आंदोलनाभोवतीच फिरते जयवंतदळवी यांची अधांतरी कादंबरी.कादंबरीच कथानक,अगदी सहज सोपं. सावूच्या(सावित्री) आयुष्याभोवती फिरणारं. तिच कौटुंबिक आणि भावनिक आयुष्य उलगडवून दाखवणार. तिच्या आईच्या भूतकाळाचे, घर सोडून निघून जाण्याचे संदर्भ, सावित्रीच्या वर्तमान आणि भविष्याशी जोडले जातात आणि साध-सोपं असणार सावूच बालपण आणि तारुण्य यामुळे झाकोळून जातं .

लग्नानंतर जगण्याची नव्याने सुरूवात करणारी सावित्री, नोकरीच्या निमित्ताने आयुष्यातं होणारे हवहवेसे बदल अनुभवण्यात इतकी हरवून जाते, की आपण स्वत:च आयुष्यच अधांतरी करत आहोत याचही भान तिला राहात नाही . तारुण्यातल तिचं पहिल प्रेम… सतीश. आणि तो आयुष्यातून कायमचा दूर गेला, तरी त्याचाच संदर्भ आयुष्यातील इतर पुरुषांसोबत जोडून, जणू सतीशच आयुष्यात पुन्हा आला आहे अशी स्वत:चीच फसवणूक करून घेणारी सावू… आपल्या नवऱ्यावर, मुलावर जीवापाड प्रेम करणारी, पण वेळ आल्यावर स्वत:च्या सुखाचा विचार करून क्षणात त्यांच्या सोबतची सारी नाती तोडून वेगळी होणारी सावू…. शरीराच्या गरजांना, भावनांची किनार जोडून, स्वत:चा हसता-खेळता संसार मोडून,केटी (कृष्णकांत )कडे जाणारी सावू.. मुलाने केलेल्या आपमानाने कोलमडून जाणारी सावू … .आणि या सगळ्या भावनिक, शारीरिक, मानसिक गोंधळात शेवटी एकटीच उरणारी सावू…

१९८३ला या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली, मात्र यातले संदर्भ आजच्या जीवनातलेच वाटावे इतके आपलेसे वाटतात. प्रत्येकाच्याच मनात स्त्री- पुरुष नात्यांचे आणि त्यांच्या अर्थाचे असणारे अनेक गोंधळ या कादंबरीतून आपल्याला सामोरे येतात. सावित्रीने, केटीबद्दल वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणाचा, प्रेम या भावनेशी जोडलेला संबंध आणि त्यातून तिला स्वीकारावे लागलेले भयाण वास्तव.. सावित्रीच्या लहानपणापासून, तिच्या मनामध्ये स्वताच्या सुंदर , मादक शरीराचा असणारा छुपा अभिमान आणि त्यातून तिचा स्वत:शीच सुरु असलेला संघर्ष याच जयवंत दळवींनी केलेलं वर्णन वाचून , आपणही सावित्रीच्या आयुष्यात आपल्याही नकळत गुंतत जातो.

वैशिष्ट्य

  • लेखक: जयवंत दळवी(©गिरीश जयवंत दळवी )
  • प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
  • मूल्य: २०० रुपये.
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: २२० पृष्ठे.
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 545