LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
अनुभूती

अनुभूती

0.0/5 rating (0 votes)

नमस्कार! आत्तापर्यंत अनुभूति संग्रहातील विविध प्रभागा मधील कवितांबद्दलचे ब्लॉग्स वाचलेत. पण मनस्विनीने अशाही काही काविता केल्या आहेत, ज्या साधाराण अनुभवांना वेगळ्या ढाच्यांत बसवतात. वाढदिवसाचे 'अभिष्टचिंतन' हा आपल्या संसृतीचे एक अंग आहे.

आजच्या इंग्रजलेल्या संस्कृतीत birthday हा केक, पार्टी नि गिफ्ट यांनाच महत्त्व देतो. पूर्वीप्रमाणे आई-वडिलांना, घरातील सर्व मोठ्यांना, वडीलधाऱ्यांना नमस्कार करून झाल्यावर, घरातील प्रत्येकजण त्यांच्यात्यांच्या पद्धतीनं birthday boy / girlचं कौतुक करत. कुणी उचलून घेई, कुणी मुका घेई, कुणी तोंड गोड करीत तर कुणी स्वतः बनवलेली वस्तू भेट देत असत.

पहाटे आईने उटी लावून घातलेली अंघोळ, नवीन कपडे, गोड गोड आवडीचं जेवण, मित्र मैत्रिणींचा गराडा आणि आपल्या मनासारखं वागायची मुभा! कितीही कौतुकानं मुलांना वाढवलं तरी आई-वडील व ती मुलं यांच्यात असणारं पिढीचं अंतर विसरता येत नाही. ती मोठी झाल्यावर त्यांची आवड, मित्र मैत्रिणींचा प्रभाव / अपेक्षा यामुळं ती कधी पठडी सोडून वागतात, बिघडतात! त्यांच्या कडून 'अक्षम्य चूक' होते, ती कवितेत पहा. भावनाप्रधान मनस्विनी मनाच्या कोणत्या अवस्थेत गीत जन्मते हे, 'जन्मते गीत' कवितेत सांगते. हा नाविण्य पूर्ण विषय मनस्विनी अनोख्या प्रकारे हाताळते. 'नयना' ही कविता नेत्रांतील विविध भावना स्पष्ट करते.

स्त्री व तिच्या भावना यांची सांगड घालते. 'एकाकी' आणि 'लहर'या दोन चिमुकल्या कविता वाचकावर खूप प्रभाव टाकतात. हे ती वाचकांच्या कुवतीवर सोडते. आपण काढाल तेव्हढे अर्थ त्यांत निघतील. आयुष्यात सुख दु:ख हातात हात घालून चालतात (ह्याला काही अपवाद आहेत) दोन्ही प्रसंगी प्रत्येकाला असणारी मित्रंची जरुरी 'फ्रेंडकी जरूरत' कवितेत लिहिले आहे. परक्या घरातून आलेली 'स्नुषा' ही पोटच्या मुलापेक्षा ही अधिक आपुलकीने सासर आपलंसं करते. वृद्ध सासऱ्याची आपल्या वडिलांसारखी काळजी घेते व आधार देते. तेव्हा भारतीय संस्कृतीचा मनस्विनीला अभिमान वाटतो. चिरतरूण मनस्विनी जेव्हा आजच्या तरुण मंडळींच्या संपर्कात येते, तेव्हा या तरुणांची दिशाभूल झालेली तिला आढळते. अडचणींचा सराव नसलेल्या पिढीला स्त्रीसुलभ पद्धीतीने बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. म्हणून वर्तमानात चिरतरुण अवस्थेत ती जगावे असे recommend करते.

वैशिष्ट्य

  • लेखक: मनस्विनी
  • प्रकाशक: समोशवर्डस
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: १६,५४० शब्द
  • ISBN-10:
  • ISBN-13: 9781311382672
  • टिचक्या: 445

संबंधित पुस्तके