LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
चन्द्र जिथे उगवत नाही

चन्द्र जिथे उगवत नाही

0.0/5 rating (0 votes)
रूपा आणि सतीश यांची हेलकावे सहन करणारी प्रेमकहाणी.

टॉलस्टॉय हा थोर तत्त्वचिंतक होता तसाच श्रेष्ठ कादंबरीकार. त्याच्या वॉर अॅण्ड पीस आणि अॅना करेनिना प्रमाणेच रेसरेक्शन हीही एक महत्त्वाची आणि त्याची अखेरची कादंबरी. एका सामान्य स्त्रीच्या आयुष्यातील प्रचंड चढउतारांचे त्यातील चित्र-नियतीचे खेळ आणि मानवी मूल्ये यांचा मनोवेधक आलेख वाचकासमोर ठेवतात.

वि. वा. शिरवाडकरांनी हे कथाबीज घेऊन चंद्र जिथे उगवत नाही या नाटकाची रचना केली आहे. ही फक्त रूपा आणि सतीश यांची हेलकावे सहन करणारी प्रेमकहाणी नाही तर पापपुण्याच्या कल्पनांचा पुनर्विचार करायला लावणारी, म्हटले तर नीतिकथा आहे. चमत्कारिक घटनांमुळे कुंटणखान्यात पोचलेली, त्यातून आशेचे किरण दृष्टिक्षेपात येत असताना तितक्याच चमत्कारिक घटनांमुळे पुन्हा हरवून बसणारी रूपा ही शिरवाडकरांच्या श्रेष्ठ व्यक्तिरेखांपैकी एक आहे.

मुळात १९८१ साली प्रसिद्ध झालेल्या नाटकाची ही शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्ती पॉप्युलर पुन्हा एकदा प्रकाशित करत आहे. यात नाट्यप्रयोगाविषयी नाट्यकर्मी विनय आपटे आणि मधु कांबीकर यांनी लिहिलेली टिपणे दिली आहेत.

वैशिष्ट्य

  • लेखक: वि.वा.शिरवाडकर्
  • प्रकाशक: पापुलर प्रकाशन
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: 78 पृष्ठे
  • ISBN-10: 8171856934
  • ISBN-13: 978-8171856930
  • टिचक्या: 310

संबंधित पुस्तके