LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
जीवन सुगंध

जीवन सुगंध

0.0/5 rating (0 votes)

‘‘जीवन सुगंध हे अॅड-विलास नार्इक यांचे तिसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. परिश्रमपूर्वक उभारलेल्या एखाद्या बगीच्यात प्रवेश केल्यानंतर तेथील हिरवळ विविध प्रकारच्या रंगांतील अनेक आकारांच्या आणि प्रकारांच्या पानाफुलांच्या सानिध्यात आपण सर्वकाही विसरुन रममाण होतो, आनंद घेतो असाच अनुभव अॅड-विलास नार्इक यांनी जीवनातील विविध पैलूंनी फुलविलेल्या ‘जीवन सुगंध रुपी बागेतल्या अंतरंगात शिरल्यानंतर येतो- अनुभवलेल्या गोष्टीत लपलेली कथाबीजं लेखकाने या पुस्तकात फुलविली आहेत त्या वाचकांना गुंतून ठेवणा-या आणि त्यातून एक वेगळाच वाचनाचा आनंद देणा-या आहेत.

कथांमधील व्यक्तीरेखांची सजीवता व्यक्त करण्याची लेखकाची उत्कटता नावाजण्यासारखी आहेच शिवाय त्यांनी आपल्या लेखणीतून चितारलेले अनेक प्रसंग आणि विचार वाचकांना अंतर्मुख करणारे आहेत.

अॅड- विलास नार्इक यांनी साध्या,सोप्या आणि सरळ भाषेत उत्तम शब्दरुप देण्याची स्वतची खासियत याही पुस्तकातून जपली आहे. त्यांनी एकूण 32 जीवंत कथांचा अमूल्य ठेवाच जणूं या पुस्तकातून आपल्या पुढे ठेवला आहे- हे लेखन वाचताना यातील कथांचे आणि प्रसंगांचे आपणही सहप्रवासी असल्याची अनुभूति येते.  मराठी महाराष्ट्रीय परप्रांतीय यातील दोन हाकेच्या अंतरावर माणसामाणसांतून जाणवणारा फरक दाखवून देतानाच लेखकाने नजरेतून दिसणारे भाव ‘मी मराठी मी मराठी कथेतून मांडले आहेत. गाडीतून प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला तडफडणारी चिमणी,तिला फरफटत घेवून जाणारा कावळा असे हळहळ वाटणारे प्रसंग तसेच गायवासरुचे प्रेमाचे दृश्य असे निराशादायी आणि आशादायीसुध्दा प्रसंगांची मांडणी ‘क्षण तो क्षणात गेला मध्ये आहेत- ज्याला स्वतच्या नशीबाचे कुलूप उघडता आले नाही तो जगाचे बंद दरवाजे उघडतोय अशी यथोचित सुरुवात केलेल्या ‘चावीवाला’ कथेत चावीवाल्यासोबतचे संवाद आणि त्याला अनुभवताना वाचकाला सोबत उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

स्त्री म्हणजे त्याग करणारी संसारी दूरदृश्टीची बंडखोर अशा विविध रुपांचे दर्शन अॅड-विलास नार्इक यांच्या कथांतून घडते- अशीच काही रुपे लेखकाने ‘चारचौघी' ‘क्षमा' 'झुंज' ‘प्रवास' ‘पोरखेळ  या कथांतून दाखविली आहेत. त्यातील चित्रणं वाचकांच्या काळजाला भिडणारी आहेत- स्त्रीयांच्या व्यथांच्या अनेक छटा दाखवून देण्याचा लेखकाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे- ‘पाउ्स ओला कथेव्दारे लेखकाने बालपणात शिरकाव केला आहे- चिंब करणा-या पावसाच्या ओल्या आठवणींचे मनात लपलेले खोडकर बालपणाचे वर्णन वाचताना वाचकालाही बालपणात रमून जाण्यास लेखक भाग पाडतो- होत्याचं नव्हतं कस झालं आणि घर फिरले की वासेही फिरतात याचा प्रत्यय लेखकाने ‘कोण होतास तू या कथेतून आणून दिला आहे.

अॅड- नार्इक यांच्या वास्तववादी कथा वाचकांना मंत्रमुग्ध करतात- बाबामहाराज सातारकर या ध्येय वेड्या महान कीर्तनकारांच्या सान्निध्यातील ‘आनंदयात्री मधील लेखकाचे अनुभव कथन मंत्रमुग्ध करणारेच आहे. वेड्या आशेवरचे जगणे कसे असते- जीवन हे अळवावरचे पाणी असते- कधी पानावरून घरंगळेल याचा नेम नसतो आणि मरणाची आळवणी कशी गरज बनते असे विचार करायला लावणारे क्षण शब्दबध्द झालेत ‘इच्छामरण' कथेत जीवावर उदार होवून साहस करणारा आणि त्यासाठी बघ्यांची गर्दी जमविण्याचे व्यसन जडलेल्या तरूणाची स्वतःच्या आयुष्यातील जमाखर्चाच्या वाटचालीची लेखकाने रंगविलेली ‘उमा' मधील कथा वाचताना आपलेही मन लाटांसारखे हेलकावे खावू लागते.

वेडे म्हणून संबोधल्या जाणा-या अभागी जीवांचा मागोवा घेता घेता त्यांच्या विषयीचे अनेक प्रश्न उपस्थित करून ‘वेडा' या आपल्याला अस्वस्थ करणा-या कथेत लेखक म्हणतो, स्वत:वरची जबाबदारी झटकणारे फुकाच्या गोष्टी करणारे त्यांच्याकडे गांभीर्याने न पाहणारे खरे वेडे आपणच माणसाला केवळ संस्कार वाचवित नाहीत. विचारच चांगले असून भागत नाही तर त्याला परिस्थिती घडवत असते- महत्वाकांक्षा त्याला पशु बनविते असे जीवनाच्या विविध रंगांतून दोन तरूणांच्या वृत्तीमधील मोठी दरी उलगडून दाखविणारे नियतिच्या चढउतारातले अनुभव आहेत ‘फरक या कथेतले ‘कालचा दिवस चांगला होता या कथेतून लेखक सांगतो,आपण आपलेच शिल्पकार असतो केवळ स्वभाव बदलायचा दृश्टी बदलायची कारण सुंदरता आपल्या नजरेत असते की मग तो दिवस आपला वाटू लागतो- हा लेखकाचा प्रफुल्लित करणारा आशावाद वाचकालाही आनंद देवून जातो. तर स्वतःहून अंगावर जबाबदा-या ओढवून घेणारा समाजसेवक लोकांनी डॉक्टर पदवी बहाल केलेला एक निष्काम सेवाकर्मी आपल्याला भावतो ‘दृश्टीदाता' कथेतून..

अलिबागेतील प्रसिध्द व्यक्तीमत्व ज्येष्ठ वकील भाउ खानविलकर आणि नाना लिमये यांना लेखकाने जवळून पाहिले आहे. त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांना अनुभवले आहे आणि म्हणूनच वकीली व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्यातील अनेक पैलूंचा नेमका वेध लेखकाने ‘प्रवाहाविरूध्दचा'आणि ‘गुरूकृपा' या व्यक्तीरेखांमधून घेतला आहे. त्या वाचतांना वाचकांनाही त्या व्यक्तिरेखांविशयी नितांत आदर वाटू लागतो. यातच लेखकाचे यश सामावलेले आहे.

लेखक स्वतः वकील असल्याने वकीली व्यवसायात दररोज येणा-या विविध अनुभवांना ‘जमीनजुमला ‘न्याय ‘अपंग कायदा' अशा कथांतून त्यांनी वाट करून दिली आहे. या कथांमधून उभे करण्यात आलेले प्रसंग वाचकांच्या मनात खोलवर रूजविण्यात त्यात गुंतवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

अॅड- विलास नार्इक यांच्या लेखनात ताजेपणा आहे- लेखणी समृध्द आहे साहित्याच्या प्रांतात त्यांनी प्रवेष केला आणि पहिल्या दोन पुस्तकाव्दारे महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या वाचकांच्या मनात एक विशिष्ट् स्थान निर्माण केले आहे. ‘जीवन सुगंध' हे तिसरे सुंदर पुस्तकही मराठी मनाला निश्चितच उत्कृष्ट साहित्याचा आनंद देर्इल.

‘जीवन सुगंध' पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. माधवीतार्इ वैद्य यांची प्रस्तावना आहे. आकर्षक आणि बोलके मुखपृष्ठ आणि उत्तम छपार्इ असलेले हे पुस्तक पुणे येथील दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. ने प्रकाशित केले आहे. वाचकांना ते निश्चितच आकर्षित करून घेर्इल.

-- पुस्तक परीक्षण : नंदकुमार डोळस

वैशिष्ट्य

  • लेखक: विलास नाईक
  • प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
  • मूल्य: रु. 200
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे:
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 796

संबंधित पुस्तके