LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
मनमंदिर

मनमंदिर

0.0/5 rating (0 votes)
मनमंदिर नव्हे ---- साहित्य मंदिर

विलास नार्इक हे अलिबाग येथील प्रतिथयश वकील आहेत. दिवाणी व फौजदारी क्षेत्रात यश संपादन केलेली, व पब्लीक प्रोस्युक्युटर सारखे महत्वाचे पद सांभाळलेली जी मोजकी मंडळी आहेत, त्यामध्ये विलास नार्इक हे अग्रभागी आहेत.
ते स्वत: उत्तम चित्रकारही आहेत. त्यांनी ललीत लेखनाला फार उशीरा, म्हणजे वयाची पन्नाशी उमटल्यानंतर सुरुवात केली. आणि अवघ्या दीड दोन वर्षात त्यांच्या नावावर तीन पुस्तके जमा झाली. ‘एक ना धड’ (अनुभव कथन), ‘कळत नकळत’ (अनुभव कथन), ‘जीवन सुगंध’ (कथासंग्रह) ही त्यांची सुरुवातीचीच पुस्तके खुप लोकप्रिय झाली. राजा राजवाडे साहित्य पुरस्कार (2013), डॉ.आंबेडकर लक्षणीय साहित्य पुरस्कार (2013), अंकुर साहित्य पुरस्कार(2013) असे प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार त्यांच्या या पुस्तकाना लाभते.
विलास नार्इक यांचे चौथे पुस्तक ‘मनमंदिर’ मार्च 2015 मध्ये मोठया धुमधडाक्यात अलिबाग येथे प्रसिद्ध झाले. 
‘‘धु्रव कसला, उत्तर दिशाही विसरले होतो.
होकायंत्र पहायचे तर दिशाच चूकलो होतो’’ 
अशा सुंदर काव्यमय पंक्ती सुरुवातीच्या मनोगतात त्यांनी लिहुन ठेवल्या आहेत.
‘ मनमंदिर’ हे पुस्तक अनुभव, व्यक्तीचित्रण, निबंध, कथा अशा समिश्र स्वरुपाचे आहे. ‘दत्तू भंडारी’,’ताशेवाला,’ ‘अजय भावोजी,’ ‘वामन’ अशा लेखनामध्ये उत्तम व्यक्तीचित्रण डोकावते. तर डिसॅबिलीटी सर्टिफिकेट मध्ये कीड लागलेल्या भ्रष्टाचाराचे चित्रण आढळते. ‘कुंडीतले झाड’ या कथेत एका वकील मुलीची विवाहात झालेली फसवणुक दिसते. कधीही बाप होवू न शकणा-या मुलाशी, लहानपणापासुन फिट्स येणा-या मुलाशी एका वकील मुलीचे लग्न लावून दिले जाते. परंतु ती स्वत: मनाने कणखर असुनही जन्मभर नव-याची कमकुवत बाजु संभाळुन घेतल्याचे चित्रण याच्यात आहे. ‘‘माझा वटवृक्ष आता कधीच बाहरणार नव्हता. मी मला त्या कुंडीतल्या झाडासारखं समेटून घेतल होत. कायमचं, न बोलता, अपूर्णतेतच पूर्णत्व शोधत होत.’’ असा काळजाला घरे पाडणार या कथेचा शेवट आहे.

तर ‘गळफास’ या कथेत गळफास लावलेल्या एका बार्इच्या नव-याला जन्मठेपेची शिक्षा होते. आणि त्या तपासात त्रुटी राहिलेल्या पोलिस इन्सपेक्टरचे प्राक्तन त्यात आहे. आत्महत्या आणि हत्या यात नेमका फरक काय? चुकीचे आणि अपुर्ण पुरावे कोर्टाला सादर केले, काही साक्षीदारांनी साक्ष फिरवली, चाणाक्ष सरकारी वकीलांनी काही साक्षीदार तपासणे टाळले होते. अशा परिस्थीतीत त्या बार्इच्या नव-याने दुसरे लग्न केले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने ती दूसरी पत्नीही रस्त्यावर आली होती. प्रत्यक्ष घटना काय घडते, व कोर्टात कोणते पुरावे सादर केले जातात, साक्षीदार काय साक्ष देतात यावर कोर्ट निकाल देते. हे सर्व वकीली डावपेच सदर कथा वाचल्यावर लक्षात येते.

‘स्वामी’ या कथेत राष्ट्रियकृत बॅंकेत काम करणारी सुलोचना नावाची महिला एका अध्यात्मिक महाराजांच्या नादाला लागुन घटस्फोट घेते, नोकरी सोडते आणि आयुष्याची राखरांगोळी करुन घेते, याचे दर्शन झाले आहे.

‘ मी हाय कोळी’ मध्ये कोळीवाडयाचे चित्रण, ‘आहुती’मध्ये पाळणा न हललेल्या सुप्रियाला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करुन पोलिसांनी हात ओले करुन मॅजीस्टे्रटने जबाब नोंदवला व तिचा मृत्यु झाला. शिक्षा कोणालाच झाली नाही. परंतु सुप्रिया आयुष्यातुन कायमची उठली. बहुतेक सर्व कथानकांतील विषय गावाकडील, निमशहरी, तालुक्याचा ठिकाणाचेच आहेत.‘रात्रीचा समय सरुनी’ सारखी एखादीच कथा पूर्ण शहरी डोंबिवलीसारख्या भागातील आहे.

विलास नार्इक यांची भाषा प्रवाही आहे. कधी त्यात त्यांच्यातील पत्रकार डोकावतो, कधी चित्रकार डोकावतो, कधी स्वत:च्याच पेशातील वकील, तर कधी राजकीय व सामाजीक कार्यकर्ता. वकीलीच्या पेशातील सगळयात मोठा फायदा म्हणजे समाजातील सर्व थरातील माणसे आणि त्यांचे प्रश्न या व्यवसायानिमित्ताने कळत जातात. हेवेदादे, राजकारण, जातीभेद, समाजव्यवस्था, समाजाचे आर्थिक प्रश्न हे सारे अशीलांच्या मार्फत कळते. इतर वकीलांमार्फत हीकळते. त्यातुन फौजदारी वकील असल्यामुळे पोलिस यंत्रणा कशी चालते याचे ज्ञान होते. एखादयाला न्याय मिळणे म्हणजे काय? पोलिस यंत्रणा तो मिळू देण्यात किंवा न मिळू देण्यात कसा महत्वाचा भाग आहेत. वकील, साक्षीदार, पुरावे कसे सबळ किंवा दुर्बळ केले जातात. याचे समग्र दर्शन फौजदारी वकीलाला होते. अॅड. विलास नार्इक तर काही वर्षे अलिबागच्या अत्यंत महत्वाच्या व मानाच्या पदावर कार्यरत होते. आता ते स्वतंत्र वकीली करतात. अर्थात समाजाची ओळख, अंतर्गत कलह व त्यातून निर्माण होणारे ताणे बाणे याची वकीली पेशामुळे ओळख होते. मात्र हा तेवढाच घटक समर्थ लेखक बनायला आवश्यक असला तरी पुरेसा नाही. भाषेची आवड, लिहीयाची तळमळ, व अनुभव नेमक्या शब्दात मांडायचा असतो, हे तीन सर्व गुण अशा अनुभवांचे सकस साहित्यात रुपांतर करण्यास आवश्यक आहेत, आणि हे गुण नार्इक यांच्याकडे पुर्ण ताकदीनिशी आहेत. म्हणुनच नार्इक हे उत्तम लेखक म्हणुन मान्यता पावत आहेत. अन्यथा ते काळा कोट घालून कोर्टातच दिसले असते.

माणुस आणि माध्यम हा मोठा गमतीचा विषय आहे. माणूस स्वतंरीत्या सर्वत्र पोचू शकत नाही म्हणुन त्याला माध्यम लागते. आणि माध्यम त्याला सर्वपूर, सर्वत्र पोचवते. आज लेखक म्हणून नार्इक यांची पुस्तके मुंबर्इ, पूणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नागपुर आणि कोकण विभागात विकली जात आहेत याचा अर्थ त्यांना माध्यम प्रसन्न झाले आहे असाच होतो. तीस वर्षे केलेल्या वकीली पेशामुळे नार्इक यांचा संबंध आलेल्या अशिलांच्या संस्थेपेक्षा तीन वर्षे केलेल्या साहित्य सेवेमुळे व लेखनाच्या माध्यामामुळे नार्इक यांच्या वाचकांची संख्या काकणभर जास्तच झाली असेल अशा मला विश्वास वाटतो.
विलास नार्इक यांच्या हातुन असेच उत्तम लेखन घडो, आणि त्यांच्या पुस्तकांना असेच रसिक वाचक मिळाले अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

वैशिष्ट्य

  • लेखक: विलास नाईक
  • प्रकाशक: नंदिनी पब्लीकेशन हाऊस, पूणे
  • मूल्य: रुपये 230
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: 230 पृष्ठे
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 609