LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
निळ्या डोळ्यांची मुलगी

निळ्या डोळ्यांची मुलगी

0.0/5 rating (0 votes)

ही कादंबरी म्हणजे उल्का चाळके या बौद्ध मुलीची गोष्ट आहे. या मुलीची शाळकरी वयापासून ते लग्नाच्या वयाची तरुणी होईपर्यंतची गोष्ट ही कादंबरी सांगते. या मुलीचा बाप दारूबाजीत कामातून गेलेला. या नवर्‍याची दारू त्याच्या बायकोच्या, म्हणजे उल्काच्या आईच्या जीवावर उठली, तेव्हा आईनं पोरीला घेऊन मुंबई गाठली. इथून उल्काची गोष्ट सुरू होते. सहावीत असलेल्या उल्काला तिच्या शाळेतल्या ढगेबाई "डायरी ऑफ अॅन फ्रॅंक" हे पुस्तक वाचायला देतात. त्या पुस्तकानं प्रभावित होऊन उल्कासुद्धा रोजनिशी लिहायचं ठरवते नि आपल्या रोजनिशीला "सुबी" असं नाव देते. आपल्या आईच्या वडिलांच्या घरात राहत असलेली उल्का आपली सगळी दु:खं, सुखं सुबीला सांगत राहते. शाळेतल्या, घरच्या, इतर बाहेरच्या घडामोडी असं सगळं त्यात येतं.

 ही कादंबरी आपल्याला अशा सर्वसामान्यांच्या जगण्यातून निघालेले निष्कर्ष सांगते. असे सर्वसामान्यांचे निष्कर्ष सांगणं हे काम साहित्य/गोष्टीतून असं सहजपणे होत असेल, तर मग ते किमान समजून घ्यायला तरी ही कादंबरी वाचायला हरकत नाही

वैशिष्ट्य

  • लेखक: शिल्पा कांबळे.
  • प्रकाशक: गोदा प्रकाशन.
  • मूल्य: २५० रुपये.
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: १९० पृष्ठे.
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 755