LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
शोध

शोध

2.3/5 rating (3 votes)

मी वाचलेले अस्सल मराठीत पहिलेच थ्रिल्लर. शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सन 1670 मध्ये सूरत लुटली. एवढी मोठा खजिना स्वराज्यात घेऊन येतांना मुघल सैन्य पाठलाग करत आले. त्यामुळे खजिन्याचे दोन भाग केले. त्यातला एक भाग स्वराज्यात सुखरूप पोहोचला. पण दूसरा खजिन्याचा मोठा भाग मुघल सैन्याच्या हाती पडू नये म्हणून सहयाद्रीच्या कुशीत दुर्गम डोंगरात दडवला गेला. हा बहुमूल्य खजिन्याचा शोध गेली साडेतीनशे वर्षात कित्येकानी घेतला.

आजच्या काळातील जमीनीखालील खोलवरील असलेल्या खनिजे, धातुचा शोध घेणारी यंत्रे, जीपीएस, हेलिकॉप्टर, ड्रोन, वगैरे आधुनिक यंत्र, साधनसामुग्रीचा वापर करून खजिन्याच्या शोधासाठी केलेल्या प्रयत्नाची रहस्यमय थरारक कथा. खजिन्याचे जुने दुर्मिळ नकाशे, जुने नाशिक येथील जुने वाडे अरुंद गल्ली-बोळ, आणि डोंगर-दर्‍या तला वेगवान पाठलाग, मर्डर-मिस्ट्री. एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या, दिलेला चकवा असा हॉलीवूड सिनेमाच्या पटकथेसारखा 72 तासांचा वेगवान घटनाक्रम यामुळे वाचकाला 500 पानी पुस्तक खाली ठेवण्याची उसंत देत नाही. 
कादंबरी वाचून पूर्ण होते त्यावेळी आपल्या हाती विविध माहितीचा समृद्ध खजिना लागलेला असतो. सहयाद्री डोंगर रांगातले आदिवासी समाजाच्या सण परंपरा चालीरीती, यांचे एक आगळेवेगळे जगाची सफर होते. चौदा हजार चामड्यांच्या पिशव्यातल्या खजिन्याचे काय होते? शिवाजी महाराजांचा सूरत लुटीमागचा हेतु दृष्टीकोन काय होता, या लुटीनंतर सूरत आणि स्वराज्य यातल्या अर्थव्यवस्थेत दूरगामी काय परिणाम घडून आले याच्याही रहस्याचा शोध कादंबरी वाचतांना होतो. वाचकाला यातले रहस्य कळूनही पुन्हा पुन्हा वाचायला उद्युक्त करते, हेच लेखकाच्या लिखाणाचे यश. 
एका झपाट्यात कादंबरी वाचून संपवली. तरीही भन्नाट कादंबरी पुन्हा एकदा वाचायला उद्युक्त करतेय..! पुन्हा तोच थरार अनुभवण्यासाठी...!!

शब्दांकन -- जयंत जोपाळे

वैशिष्ट्य

  • लेखक: मुरलीधर खैरनार
  • प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
  • मूल्य: ४५० रुपये
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: ४९७ पृष्ठ
  • ISBN-10: 8174348816
  • ISBN-13: 978-8174348814
  • टिचक्या: 894