LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

सप्तरंग

साहित्य, पत्रिका, ज्ञान-विज्ञान, विचारधन, दिनविशेष ई.
इथे लेख, कविता, ज्ञान-विज्ञान, विचारधन अशा बहुआयामी विषयांवर पुस्त करू शकता.
माझे सप्तरंग
कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4)

कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4)

0.0/5 rating (0 votes)

मराठी माती

सामाजिक राष्ट्रीय प्रवृत्तीबरोबर वाट्चाल करणे ह कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा धर्म आहे, आणि तो विशाखा ,किनारा यासारख्या संग्रहातून दिसून येतो, तसाच १९६० साली प्रकाशित झालेला "मराठी माती " हा संग्रह देखैल त्याल अपवाद नाही. विशाखेत आंतरराष्ट्रीय समतावादाकदून, किना-यात स्वतंत्र्यजाणीवेकडे गेलेल कुसुमाग्रजांचा काव्यप्रवास " मराठी माती" मध्ये प्रादेशिक जाणीवेत गेलेला दिसतो. कदाचित या संग्रहामागे तत्कालीन संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा देखिल दृष्टीकोन असू शकतो. मारठी माती मधे वैभवशाली इतिहासाच गौरव क्लेला उघड आहेच!

किना-यानंतर म्हणजे १९५२ ते १९६० हा कालखंड इतिहासाच्या संघर्षाच्या दृष्टीने शून्य आहे कारण स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतरचा हा काळ हा काळ कॄतार्थतेची भावना जनमानसात रुजवलेला हा काळ होय.या भावनेत व्यप्त असलेल्या समाजल या काळात एक निश्चिंत निद्रा होती असे म्हणायला हरकत नाही, या निश्चिंत निद्रेचा प्रभाव कुसुमाग्रजांच्या कवितांवर देखिल दिसून येतो. "ध्वजगीत" ही या संग्रहातील एकेमेवे राष्ट्रीय कविता, त्यातही संघर्ष दिसून न येता कृतार्थताच दिसून येते.

माझा भारताचा ध्वज, उभा अजिंक्य आकाशी, नव्या मनूचा प्रवास, याच्या मंगल प्रकाशी
माझ्या देशाच्या दैवता, तुला सहस्त्र वंदन, तुझ्या रक्षण सेवेत, हो कृतार्थ जीवन.

सामजिक राष्ट्रीय भावनेपेक्षा मनोव्यथेतील भाव व्यक्त करणा-या कुसुमागंजांचा संगह असे देखिल "मराठी माती" ह्या संग्रहाला संबोधता येईल. प्रेम, निसर्ग, अध्यात्म, या जाणीवा कवीला अधिक जवळच्या वाटू लागल्या असं काहीसं ह्या संग्रहातून स्पष्ट होतं. आपले प्रेम मनात ठेवणारा नायक या संग्रहातील अनेक कवितांमधे दिसून येतो.
" नाही" या कवितेच्या काही ओळी बघू.
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
नक्षत्रांच्या गावचे, मला गवसले गूज, परी अक्षराचा संग, त्याला लाभणार नाही

याच कवितेत कवी शेवटी म्हणतात,
तुझ्या कृपाकटाक्षाने, झालो वणव्याचा धनी, त्याच्या निखा-यात कधी, तुला जाळणार नाही.

कवितेतील नायक हा आपल्या प्रेमाचे स्पष्टीकरण कधी खुलेआम देतच नाही मात्र आतल्या आत त्याच प्रेमासाठी झुरत राहतो अशा अर्थाच्या अनेक कविता या संग्रहात दिसतात. आता "आहे ती व्यथेची" या कवितेतील ओळी बघू
प्रीत न अपुली संतोष सुखाची सारंगी बिनाची, आहे ती व्यथेची, गहन दु:खाची, अथांग मौनाची

विशाखेत कवी कधी निस्सीम प्रीतीची याचना करतो आणि पृथ्वीचे प्रेमगीत तयार होते तर कधी त्याच प्रेमापासून दूर जात किना-या स्मृतींनी व्याकुळ कविता पुढे येते आणि मराठी माती त्या प्रेमाची वाच्यता देखील नको असा निर्धार कविच्या कवितेतून दिसून येतो, मात्र त्यांच्या नाट्यगीतातील प्रीयकर प्रेयसी या मौनाने त्रस्त झालेले देखिल दिसून येतात. प्रीयकराच्या प्रेम लपवण्याच्या वृत्तीमुळे प्रेयसिच्या वाट्याला आलेला एकाकी पणा हा "धीर", "बंदीवान", "दिलासा", या नाट्यगीतातून व्यक्त झाला आहे.मातीचे गायन ह्या कवितेच्या काही ओळी बघू. यात व्याकुळ प्रेयसी म्हणते,
माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी, जरा कानोसा देऊन, ऐकशील का रे?
माझ्या जहाजाचे पंख. मध्यरात्रीत माखले, तुझ्या किना-यास दिवा, कधी लावशील का रे?

आणि याच गीताचे शेवटचे कडवं गाताना प्रेयसी म्हणते.
माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला, तुझ्या उषेच्या ओठांनी, कधी टिपशील का रे?

तसेच धीर या कवितेची व्यकुळता दोन ओळीतून देखील तीव्रपणे जाणवते.
मला उमगल्या पांथा तुझ्या प्रणयाच्या खुणा, आता मिलनाच्या मार्गी तुझा धीर मात्र उणा..

मराठी मातीत अध्यात्मिक जवळीक ही जास्त जाणवते तर विशाखेत मात्र जवळजवळ ती नास्तिकतेकडे जाते.
दिवसासह सरले सगळे वादविवाद, ते शब्द बापुडे वा-यावरचे नाद
वा-यातच विरले उरले मी पण एक, झंकारत ये त्या तव एकान्ती साद..

मराठी माती चे एक अजून वैशिष्ट्य म्हण्जे शुद्ध निसर्ग वर्णन! या संगराहच्या निर्मितीत निसर्ग रचना जास्त आढळून येते. विशाखेत , किना-यात देखिल ते होतेच, परंतु मराठी मातित त्याची ओढ शिगेला गेल्याचे जाणवते. सांज","निळ्या गडावर", "छाया" "बंधन" या कवितांधे निसर्ग प्रेम हे दाटून आलेले आहे. मराठी मातीपासून कुसुमाग्रजांच्यात दाटून आलेले हे निसर्ग प्रेम कधी आटलेच नाही, शेवटी शेवटी तर निसर्गाच्या पोटातून निघालेली ही प्रतिकं ह्या उपमा हट्टाने कुसुमाग्रजांच्या कवितेत लडिवाळ्यासारख्या येऊन बसतात की काय असे वाटते..दूरस्थ तारके कडे बघत बसणारे कुसुमाग्रज कवितेच्यानिमित्तने त्या तारकेला हृदयस्थ करून अगदीच जवळ कधी करून घेतात हे मात्र उलगडत नाही.

मराठी मातीनंतर केवळ दोनच वर्षात म्हन्जे १९६२ साली स्वगत हा कुसुमाग्रजाम्चा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. स्वतंत्र भारताच्या संघर्ष हीन कालखंडातील हा खाळ. स्वगत मधे व मराठी मातीमधे प्रकर्षाने फ़रक जाणवतो तो भावावस्थेत. याचे मुख्य कारण म्हणजे या संग्रहात व्यक्तिवर्णनात्मक व स्थल वर्णनात्मक कविता जस्त दिसून येतात हे होय. शिवाजी , बापू गोखले, बाजीराव इत्यादी इतीहास प्रसिद्ध व्यक्ती हा एक विषय तर खुलदाबाद, आग-याच्या किल्यात, साचि १, साची २ , कैलास लेण्यात,या कवितांमधे १९६२ ला बरच पुढे सोडून इतिहासाकडे वळलेलं त्यांचं मन दिसून येतं.

सामजिक पातळीवर मात्र कुसुमाग्रजांची जाणीव नेहमीच उफ़ाळून येत असते. ही जाणीव मराठी माती पेक्षा स्वगत मधे जास्त आहे हे जाणवते. आपली जगरुकत व त्यावर च्या प्रतिक्रीयांकडे तटस्थपणे बघण्याची त्यांची प्रव्रूत्ती "सवग्त’ मधे आढळून येईल. याचाच अनुभव कुसुमाग्रजांच्या "अनोळखी" य कवितेतून दिसून येईल.
हजार डोळ्यामधले पाणी, माझ्या डोळ्यांमधे जमे, हजार कंठातील घोषणा, माझ्या कंठामधे घुमे
हजार हृदये गहिवरती तर, मन माझेही गहिवरते, असे हजारासंगे आहे, जडलेले माझे नाते
असेच आहे आणि तरीही, अनोळखी मी सदाच राही, दूर हजारापासूनि आहे, विजनामधे माझे घरटेमीपण भरले जयात माझे, जे आहे माझ्यापुरते.

सामजिक पातळीवर बहिर्मुखता आणि व्यक्तिगत पातळीवरील अंतर्मुखता यांच्यामधे त्यांची जाणीव सतात स्पंदन पावते. "जाणीव" या कवितेत सामजिक प्रक्षिभाच्या क्ष्णी आपले अंतर्मुख असलेले व्यक्तित्व आपोआपच कसे बहिर्मुख होत जाते यच त्यांनी आलेख काढला आहे. ते म्हण्तात "माझ्य अनुमतिची प्रतिक्षा न करता ही अजस्त्र लाट माझ्या जीवना वरून जात आहे, ती देखिल अफ़ाट वेगाने. तो राकशसी प्रवाह वरून जातान माझे अंतकरं गुदमरते आहे दूरतेते पोसलेली माझी अहंता जागोजाग चिरल्या जते आहे’

एखाद्या नाट्कातील नायकाच्या स्वगतासारखं हे स्वगत, त्यातून्च प्रकट झालेल्या नव्या जीवनाचा नाद लिहितान ते म्हणतात-
गेल्या दिवसाने दिली, येत्या दिवसाला हाक
अभावात रुतलेले, हाले चैतन्याचे चाक
धरतीच्या उदरात, आली कोळ्शाला जाग
अंग आसुसले त्याचे, व्ह्याया ईधनाची आग...     किंवा

शून्य अवस्थेमध्ये भयानक, जाण मनाची मम साकळते
विनाश व्हावा अवघा भवती, एकेच संज्ञेला कळते

विशाखेतील जाणीवेषी संवादी अशी हि स्वगताची जाणीव. शून्यातून निर्मिती हेच सुत्र हाती धरून स्व्गत उदयास आला असे म्हणता येईल. कुसुमग्रजांछी गंभिर प्रकृती लक्षात घेता "राजा आणि मंत्री" यासरख्या उफासिक कविता मात्र प्रभावहीन ठरतात.

मराठी माती मधिल परतत्वजाणिवेच शोध कायमचाच. अस्तिनास्तिचा संघर्ष इथेही संपलेला नाहीच. हवी असणारी नस्तिकता मात्र मनाला बिलगून बसलेली आस्तिकता कुसुमाग्रजांना "जोगीण" लिहिण्यास भाग पाडते
एकीकडे जोगीणीसारखी मित्भाषी उदासिन आस्तिकता आणि दुसरीकडे मन मोहून टाकणारी नृत्यांगना नास्तिकता रंगवतान कवी म्हणतात-
मला हवी आहे नस्तिकता, पण सहस्त्र वर्षे मनाल मिठी
घालून बसलेली ही आस्तिकता, होत नाही दूर माझ्यापासून

रंगमंचावरील प्रवासात, व्याधाच्या नक्षत्रासारखी
विविध रंगात उमलणारी, सुरेल पदन्यास करीत
माझ्या अंतकरणात प्रवेश करणारी, ती मोहक नृत्यांगना
उभी आहे माझ्या मंदिराच्या दाराशी

पण मलीन वस्त्रे परिधान करून, गहन काळोखात गुरफ़टलेली
एकतारीवर एकच एक गीत गाणारी, ही उदासी मितभाशी जोगीण
मान टेकून दरवाजाच्या स्तंभावरती, बसली आहे वाट अडवून, प्रवेशाच्या पायरीवर

मनमंदिराच्या पाय-याशी अनादि कालापासून दोकं ठेवून बसलेली ती आस्तिकतेची जोगीण दूर तर होत नाही आणि ही नास्तिकतेची नृत्यांगना आत येऊ पाहते आहे...इथे एका अध्यत्मिक पातळीवरील विश्वास व अविश्वास याच्यातील द्वंद्व दिसून येतं. आपल्या अस्तित्वाच शोध हा कितपत जातो, त्याचा निश्कर्ष आपल्या हाती लागतो का, त्या धेयापर्यंत आपण जात आहोत का हे प्रश्न देखिल कवीला भेडसावतह असतात
आणि त्यातूनच जीवनाचे ध्येय आणि श्रेय समजुन घेताना कवी ला जाणवते ती "गती"
कुसुमाग्रजांच्या काही आवडत्या कलप्नेत बसणारी एक कल्प्ना म्हण्जे गती, पक्षी, सागर, आणि निळारंग याच प्रमा्णे गती देखिल त्यांच्या लेखणीचा एक अविभाज्य घट्क. जीवन त्याची वाट्चाल व त्यांची गती म्हणजे कुसुमाग्रजांचे जीवनावरचा दृष्टीकोन असं म्हणालं तरी चालेल. गती या कवितेत त्यांच्या याच डृष्टीकोनाचा अजून खुलासा झालेला दिसतो जो पांथस्थ ह्या कवितेत देखिल बघायला मिळेल
पांथस्थ-
अज्ञाताच्या गूढ धुक्यात, अस्पष्ट्पणे तरळणा-या तुझ्या अस्तित्वापर्यंत
कोणाचीच पावले पोहचली नाहीत, आणि माझी पोहचणार नाहीत
तरीही त्या असाध्याकडे जाणा-या मार्गावरमी जातो आहे पुढे, सारखा पुढे
गतीने बधीर झालेल्या माझ्या मनाला, आता स्मरण उरले नाही त्या स्थळाचे
ज्याच्याकडे मी जात आहे, आणि राहीली नाही आवश्यकता, तेथपर्यंत पोहचण्याची..
कारण या गतीतच आहे त्या श्रेयाचे संपादनआणि या प्रवासातच आहे प्रवासाची
अंतिम सांगता...

शोधामधे गुंतलेली कुसुमाग्रजांची ही जाणीव गती मधे अजून खुले पणाने सांगून जाते ती गती, जीवनाची गती-
रात्रीच्या या रस्त्यासाठी पावलास येई गती, अस्ताव्यस्त सावल्यात सर्व रुपे दिवसाची
मावळती, अनोळखी वाटेवर क्षीण दिवे पेंगतात, स्तंभ स्तंभ आक्रमित पाय माझे चालतात
चालतात शीण सरे चालण्याचा, चालीस ये आपापता, रस्ता शिरे पावलांत तोच धनी चालवित
झाला आता, रात जागे भोवताली वाजे अदृष्यात चाळ, अंधारच्या कपारीला पेटलेला आहे जाळ कोठे तरी वाट चाले तंद्रीमधे, पुण्याकडे पापाकडे, मीच झालो वाट आता एक फ़क्त जाणवते जाणे पुढे

जीवनाची वाट ही अशीच असते जीथे चालने हा एकच मार्ग असतो.. कधी कधी ह्या वाटेवर असतो रात्रीचा अंधार, तर कधी कुठल्याशा कपारीत असलेला जाळ, मात्र थांबणे वर्ज्य..चालत राहणे आणि फ़क्त चालत राहणे .मग या चलण्याचा धरला जातो नाद , पावले एकरूप वाटेशी आणि जीवन वाट नेईल तिकडे जातो जीव..या सा-यात.

लेखिका - सुरुचि नाईक [क्रमश:भाग -5 (हिमरेषा)

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • किल्ले बाळापुर +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • निरामया +

 • जीवेत शरद: शतम +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • 1
 • 2