Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
(यश तुमच्या हातात : शिव खेरा)
माणसाचा दृष्टिकोन,वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मिलाफ़ म्हणजे पसन्न व्यक्तिमत्व.चेह-यावरचा प्रसन्न भाव हा आपल्या कपड्यांपेक्षा अधिक प्रभावकारक असतो.आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणं हे बुटांना पोलिश करणं किंवा आपलं बाह्य रंगरूप खुळवणं यासांरख्या गोष्टीपेक्षा अधिक कष्टाचं, चिकाटीचं असतं. व्यक्तिमत्वातील दोष झाकण्यासाठी अंगिकारलेल्या खोट्या आकर्षक लकबी आणि तोंड्देखले हास्य यांचा काही काळ उपयोग होईलही; परंतु लवकरच त्यातला खोटेपणा, पोकळपणा उघडकीला येईल. कारण अस वरवरचं वागणं टिकाऊ नसतं माणसाला चारित्र्य हवंच.कारण चरित्र्यहीन व्यक्तिमत्व, नीतिशून्य बुध्दीमत्ता याच्या सहवासातून, संबंधांतून आयुष्य दु:खी होते. चारित्र्य नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे चांगुलपणा नसलेलं चांगल दिसणं आहे. आयुष्यात यशस्वी राहायचं असेल तर त्याला व्यक्तिमत्व आणि चारित्र्य दोन्हीची जोड हवी.
(जगा पण सन्मानानं:शिव खेरा)
शिक्षण दोन प्रकारचं असतं. एक तुम्हाला उदरनिर्वाहाचं साधन देतं, तर दुसरं तुमचं आयुष्य घडवतं. कुठल्याही शिक्षणाचं ध्येय चारित्र्यसंवर्धन आणि त्यातून चांगल्य़ा नागरिकांची निर्मिती हेच असतं. कसं वाचावं हे शिकण्यापेक्षा काय वाचावं हे शिकणं अधिक महत्वाचं आहे. शिक्षण म्हणजे आपल्या अज्ञानाचा सातत्यानं शोध घेणं. कसं शिकावं हे शिकावं हे शिकणं हाच तर शिक्षणाचा पाया असतो. चांगलं आणि वाईट यांच्यामध्ये फ़रक करण्याची क्षमता शिक्षणच आपल्याला देतं. जे शिक्षण मानवतेची शिकवण देतं तेच खरं शिक्षण होय.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.