Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
नवीन हजारो गाणी असली तरी रागांवर आधारलेली जुनी गाणीच लक्षात राहतात हे मात्र आजही दिसतं.या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि मक्तेदारीच्या युगात अजुनही ब-याच शहरांमधून अनेक तरुण-तरूणी गाणं शिकताहेत, धडपड्ताहेत. काही चांगल्या संस्था त्यांना संधी देण्यासाठी उभ्या आहेत.
बाहेर मारामा-या, खून, युध्द, चंगळवाद यांचं वातावरण असतानाही मनावर फ़ुंकर घालण्यासाठी अजूनही कुठून तरी सुंदर गाण्याची एखादी लकेर येते आणि सगळं कसं पुन्हा बहरून येतं!
हे संगीत आपलं तणावचं जीवन सुसह्य बनवतं आणि आयुष्याविषयी प्रेम निर्माण करतं. आयुष्याच्या वाटेवर कितीही खाचखळगे आणि चढाउतार येऊ देत, झळझळीत यशाचे क्षण हातातून निसटून गेले तरी चालेल. शेवट्च्या श्वासापर्यंत आपली ओंजळ सुरांच्या सुगंधी फ़ुलांनी भरलेली असावी. विंदा करंदीकरांचे शब्द बदलून म्हणावंसं वाटतं- 'गाणा-याने गात जावे, ऎकणा-याने ऎकत जावे, ऎकता ऎकता एक दिवस, गाणा-याचे सूर घ्यावे.'
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.