LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

सप्तरंग

साहित्य, पत्रिका, ज्ञान-विज्ञान, विचारधन, दिनविशेष ई.
इथे लेख, कविता, ज्ञान-विज्ञान, विचारधन अशा बहुआयामी विषयांवर पुस्त करू शकता.
माझे सप्तरंग
 समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे

समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे

0.0/5 rating (0 votes)

बहुतेक मोठ्या लेखकांचा तारूण्यातला लेखनाचा बहर वयपरत्वे ओसरत जातो. निर्मितीची गती मंदावत जाते. ते अधिक विचारपूर्वक लिहू लागतात.त्यांची निर्मितीही अधिक परिपक्व झालेली दिसते. साधारणतः 'डेव्हिड काँपरफ़िल्ड' लिहिले गेले त्या सुमारास डिकन्सच्या बाबतीतही हेच परिवर्तन सुरू झालेले दिसते. पण आपल्या लेखनाचा वेग मंदावला याचे खापर त्याने कँथरिनच्या कपाळावर फ़ोडले.

घराचा सगळा कारभार कर्तबगारीने निटनेटका चालवणारी, आपल्यावरचा आर्थिक बोजा कमी करणारी अशी कँथरिन त्याला हवी होती. पण प्रत्यक्षातले चित्र अगदी वेगळे होते. लग्नाच्या सोळा वर्षांत तिला दहा मुले झाली शिवाय अधूनमधून गर्भपातही होतच होते. सतत गरोदर तरी किंवा बाळंतीण तरी असलेली कँथरीन सुटत चालली होती. तीच तारूण्य पार ओसरलं होतं. तिच्या अतिशय मोहक आवाजाचं, सुंदर निळ्या डोळ्यांचं आणि सौम्य व्यक्तिमत्वाचं हँन्स क्रिश्चन अँडर्सननेही कौतुक केलं होतं.

पण डिकन्सला बायको म्हणूनही ती आता पूर्वीसारखी हवीहवीसी वाटत नव्हती. शिवाय तिला सारखी मुलं होतात म्हणूनही तो चिडचिडा झाला होता. जणू काय तो तिचा एकटीचा्च दोष होता!वय आणि शरीर सोडलं तर ती पूर्वीचीच होती. सुस्वभावी, उदार. आपल्या नव-याला हेच गुण इतके प्रिय होते, मग आताच आपण त्याला अगदीच आवडेनासं कसं झालो हेच त्या बिचारीला कळत नव्हते. 

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • पाऊस +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • ललना लावण्यखणी... +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • सिंहगड किल्ला +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • 1
 • 2