Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
पहाटेस फ़ार लवकर जाग आली. अडीच-तीनचा सुमार असावा. खोलीच पूर्वेकडलं दार रात्री उघड्चं ठेवलं होतं. नजर आकाशाकडे गेली. पाहिलं तर शुक्र बराच वर आला होता. आकाश नितळ होतं. त्या स्वच्छ आकाशातल्या शुक्राच्या निळ्या चांद्ण्यानं फ़ार फ़ार बरं वाटलं. शुक्राची ही शितल निळवंती अशीच सृष्टी झाकून पसरलेली असावी. अन आपणही त्याच्याकडे पाहत असंच निर्बधशुन्य अवस्थेत लोळत असावं-अनंत काळापर्यंत ! मागं कसलाही पाश नाही,कुणी उठ म्हणणारं नाही, काम सांगणारं नाही. मुक्ती आणखी कशी असते ? अशीच !
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.