LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2)

कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2)

0.0/5 rating (0 votes)

विशाखा

कुसुमाग्रजांच्या जीवनावर आपण एक नजर टाकलीत मात्र त्यांच्या अथांग मनाच्या सागरातून आलेल्या काव्यरत्नांकडे पहाता त्यांच्यातील कवी जाणून घेणे आवश्यक...कुसुमाग्रजांबद्दल, त्यांच्या काव्याबद्द्ल तुलनात्मक तसेच स्वतंत्र अभ्यास झालेला आहेच मात्र तो समजून घेण्यासाठी त्यांच्या कविता आधी समजून घेणे जास्त महत्वाचे.

कुसुमाग्रज अभ्यासाच्या दुस-या भागाला सुरवात करताना त्यांच्या ’विशाखा” पासून सुरवात करावी असं मला वाटलं...इथे विशाखा या संग्रहातील कविता व त्याचे रसग्रहण समजावून घेऊ यात..याच प्रमाणे या अभ्यासाचा प्रत्येक भाग हा त्यांच्या संग्रहांवर आधारित राहील जेणे करून आपणा सर्वांनाच "संपूर्ण कुसुमाग्रज" अनुभवता येईल असाच माझा प्रयत्न असेल.

विशाखेतल्या कविता या १९३२ ते १९४४ या कालात लिहिल्या गेलेल्या. इंग्रजी राजसत्तेला दूर हकलून लावण्यासाठी सळसळना-या तरूण रक्ताची गर्मी, तीव्रता आणि व्याप वाढीस लागला होता. स्वातंत्र्याचे बिज सर्वीकडे फ़ळास यऊ लागले होते, जागोजागी स्वातंताची प्रतिकं जागी होऊ लागली होती. अंधाराला पारतंत्राचे तर सूर्योदयाला स्वातंत्र्याचे प्रतिक मानले जाऊ लागले होते...पारतंत्र्य हा शाप तर स्वातंत्र्य ही मुक्तता. ठिकठिकाणी स्वातंत्र्य जागॄती होत होती, जुन्या लड्यांशी नव्या लड्याची तुलना केली जात होती, त्यातून प्रेरणा घेतल्या जात होत्या. वर्तमान पत्र तर ह्या जागृतीचे एक साधनच! विशाखा चा जन्म हा कुसुमाग्रज प्रभात या वृत्त पत्रात कार्यरत असताना झाला.. त्या वेळीच्या ज्वलंत, आवेशपूर्ण, त्वेषाने भरलेलेल्या, निर्धाराने टणक झालेल्या वातावरणाचा परिणाम हा विशाखेतील कवितांवर जरी दिसून येत असला तरी त्यातला सुसंअवाद अतिशय कलात्मक

रितिने व्यक्त केलेला दिसतो. ह्या कविता जणू आपण आपल्यासाठिच लिहिलेल्या गायलेल्या आहेत अस भास सर्वसामन्यांना होनं हेच कवितेच यश. आपल्या भावना एका कविने तंतोतंत मांडल्याचा आनंद हेच विशाखेचं यश..आजही "गर्जा जयजयकार कविता वाचताना ते शब्द आपल्या नसानसांत तोच आवेश भरून जातात...

"जा श्वासांनो वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत

सांगा वेडी तीची मुले ही ह्या अंधारात, बद्ध करांनी अखेरचा तुज करती प्रणिपात

तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार, तयांना वेड परि अनिवार

गर्जा जयजय कार क्रांतीचा गर्जा जयजयकार...

ह्याच काळात सामाजिक एकता देखिल जनमानसात रुजु होऊ लागली होती सामजिक परिस्थितीचा साहित्यावर देखिल परिनाम होतोच, तसाच तो त्यावेलीस देखिल झालाच. सामजिक सुधारणा, क्रांती याम्नी सहित्यात जागा मिळवली. कुसुमाग्रजांच्या मनावर देखिल या क्रांतीचा प्रभाव झाला आणि त्यातूनच बळी, लीलाव, गुलाम, सहानुभुती अशा कविता लिहिल्या गेल्या. तिथूनच पुढे स्वसामर्थ्याची भावना निर्माण होऊन "कोलंबसाचे गर्वगीत" यासारख्या कविता लिहिल्या गेल्यात.

"सहका-यांनो का ही खंती जन्म खलाशाचा

झुंजण्या अखंड संग्रामनक्षत्रापरि असीम नीलामधे संचरावे

दिशांचे आम्हाला धाम"

अशा मानवाच्या अत्मविश्वासाला जागं करणा-या कवितांची त्या परिस्थितीशी एकरूपता जाणवू लागली. कुसुमाग्रजांनी या काळात सामजिक जागृती ला जुळतील अशा अनेक प्रतिकात्मक कविता रचल्या त्यात अहि नकुल, आगगाडी व जमीन,दूर मनो-यात, हिमलाट, अशा कवितांचा प्रामुख्याने समावेश होतो.कुसुमाग्रजांच्या कविता ह्या केवळ परिस्थितीशी निगडितच होत्या असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण याच काळात स्वप्नांची समाप्ती सारख्या भावपूर्ण कविता ज्या राजकीय अर्थाची छाया भासवतात की काय असा संभ्रम निर्माण करतात त्या देखिल रचल्या गेल्या.

प्रकाशाच्या पावलांची चाहुल ये कानावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर....

या ओळी एक राजकीय छाप देतात तर याच कवितेतील-

काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू वेड एक एक रात्र रहिलेले....

या ओळी एक वेगळीच छाप मनावर ठेवतात.

कुसुमाग्रजांच्या कविता ह्या त्यांचे सामर्थ्य स्वाभाविक दैनंदिन जीवनात देखिल दाखवितात. अहि नकुल या कवितेत साप आणि मुंगसाच्या द्वंद्वात दोन परस्पर विरोधी शक्तींचा संघर्ष आहे आणि म्हणूनच ही कविता परिस्थ्तीसापेक्ष व इतर अनेक अर्थछटा व्यक्त करते ती कषी ते आपण सविस्तर रसग्रहाणात पाहूच!कुसुमाग्रजांच्या कवितेत बरेच दा हा संघर्ष दिसून येतो आणि त्या संघर्षात एका घटकाला पराभव स्वीकारावा लागतो मग तो अहि नकुल चा असो वा पृथ्वी सुर्यातील मूकपणे जळणा-या पृथ्वीचा, किंवा मग तडजोडीचे समाधान तरी स्वीकारणे तरी असतेच. अशा परस्पर विरोधी प्रेरनाण्त रुजलेली असते कुसुमाग्रजांची कविता. या विरोधातही कमालीचे सौंदर्य भरणे हा त्यांच्या कवितेतील एक वेगेळेपणा पृथ्वीचे प्रेमगीत ह्या कवीतेतील काही ओळी देत आहे..

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालूनिया गळा

तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा..

विशाखे तील सर्वच प्रमुख कवितांमधे या विरोधाचा प्रत्यय येईल. अगदी पहिलीच कविता पहाता "वादळला हा जीवनसागर अवसेची रात" अशी पहिलीच निराशामय ओळ आहे तरत्याच कवीतेत कवी आपल्याला निराशेकडून आशेवर, आशे कडे घेऊन जाताना शेवटच्या ओळींत " अन लावा हृदयात सख्यांनो आशेची वात" असे आशा उदयास आणणारे शब्द लिहितो. कुसुमाग्रजांच्या कविता या त्यांच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्य सांगतात असे वाटते."नको गं नको गं आक्रंदे जमीन" असा आक्रोष करणारी जमीन व तिच्या अंगावरून धावणारी उन्मत्त आगगाडी आपल्याला पहिल्या कडव्यात दिसते तर शेवटच्या कडव्यात

" उलटी पालटि होऊन गाडी ती, हजार शक्ले पडली खालती"

अशी गाडीची अवस्था झालेली दिसते. अशाच प्रकारचा विरोधाभास आपल्याला  अहि नकुल, टिळकांच्या पुतळ्याजवळ स्मृती अशा अनेक कवितामधे दिसून येतो.विरोधातून नाट्य हे सकारातमम्क ते कडे नेणे हे जनू कुसुमाग्रजांचे वैशिष्ट्यच. हा भास घडवून आणण्यासाठी कुसुमाग्रज काव्यातील क्रीयांची उलथापालथ दर्शवतात. मात्र त्या क्रीयांचए आघात देखिल नि;पात करणारे असतात..कुसुमाग्रजांच्या भावपूर्ण कवितांमधे शब्दांना फ़ार परिणामकारक रित्या मांडलेलं आहे. "भावपराग उरि थरथरले" हे नुसते शब्द जरी उच्चारले तरी त्या भावनेचा आशय मनात निर्माण होऊ लागतो. "भाव दाटले भरारा" हे असे शब्द वाच्कांना गहिवरून टाकण्यात यशस्वी होतात.

कुसुमाग्रजांच्या काव्यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भव्यता.. विशाखेतील बहुतांश कवितेत ही भव्यता देखील आपणास बघावयास मिळते. सर्वसामान्य अनुभव देखील भव्यतेचा हात धरून उलगडणे हा त्यांच्या लेखणीचा एक पैलू. कुसुमाग्रजांच्या कवितांचा अभ्यास केला असता त्यांच्या कवितेत असीम, अफ़ाट, अथांग, अनंत ह्या शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो, त्याचप्रमाने आकाश सागर, सूर्य, पृथ्वी ,दिशांचे धाम असे भव्यतीत घेऊन जाणारे प्रतिकं किंवा कल्पनेच्या पलिकडील भव्य उलगडणारे शब्द समूह कायम बघायला मिळतात.भव्यतेचे हे वेड कुसुमाग्रजांना फ़ार आधीपासुन असल्याचे समजते, त्यांच्या पहिल्याच जीवन लहरी या संग्रहातील कवितांपासूनच भव्यता ही त्यांच्या लेखणीतच नव्हे तर स्वभावातच आहे असे स्पष्ट्च होतं दैनंदिन जीवनात येणारे अनुभव भव्य स्वरूपात मांडणे हा एक छंदच! कुसुमाग्रजांना दु:ख ही जाणवते ते एकट्यादुकट्याचे नव्हे तर समूहाचे! स्वत:ला जगाच्या भव्यतेशी जोडणारे कुसुमाग्रज म्हणतात.

"मीच जगातूनी माझ्या ऊठतो, जगात फ़िरतो

जग माझ्यासम करतो, पुन:श्च म्हणतो असे तसे हे

त्या भ्रांतीतच जगतो आणि मरतो...

पृथ्वीच्या प्रेमगीताततील ह्या ओलि पृथ्वीचे सूर्यावरील प्रेम कशा प्रकारे व्यक्त करते ते पहा..

परि भव्य ते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षुद्र शॄंगार तो दुर्बलांचा, तूझी दूरता त्याहूनी साहवे

कुसुमाग्रजांच्या ह्या भव्योत्कट स्वभावामुळेच ह्या कवितांचा आवाका देखिल अफ़ाट होत जातो. काळोखाचे सागर तारकांची दळे, कालाची पाखरे, जीवनसागर असे भव्यता दरशविणारे शब्द कवितेचा एक विशिशःट घाट निर्माण करतात. आशयाची भव्यता या भव्य पणात तितकीच टिकून राहते हे मात्र निश्चित.विशाखेचा विचार करता ना कुसुमाग्रजांच्या  काव्याचं एक अजून वैशिष्ट्य समोर येतं ते म्हण्जे आविर्भाव. घटनांचा क्रम त्यांची घडण मांडताना कुसुमाग्रज त्यांच्यात एक नाट्यपूर्ण आविर्भाव निर्माण करतात. "गडबडलोळणारा वात", लचकत मुरडत थबकत जाणारा सर्प..साप नव्हे सर्प, तर "घट हले शिरावर चरण्चालिने धूंद" अशी वनराणी, " वणव्यांच्या मेखला कमरेस बांधून तळहातावर ज्वाला नाचविणारा ग्रीष्म (किनारा) असे शब्द त्यांच्या कृती, घटना, क्रीया, यांच्या अंगातून नादमय आविर्भाव समोर ठेवून सजीव काव्यचित्र उभं करतातह्याच ओळी बघा ना..

जिवंत थरार नजरेसमोर नाचू लागतो..

रण काय भयानक -लोळे आग जळात आदळती, वळती, आवळती क्रोधात

जणू जींकायासी गगनाचे स्वमित्व, आषाढ घनाशी झुंझे वादळवात....

क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, शतखंडित झाले ते गर्वोन्न्त ऊर

विच्छिन्न तनूतून उपसुनी काढूनी दात, वा-यापरी गेला नकुल वनातूनी दूर...

 केवळ दोन कडव्यांमधून पूर्ण कवितेचे स्वरूप आपल्या समोर उभे राहते.कुसुमाग्रजांच्या कवितांमधे यमकापेक्षा देखील नादाला जास्त महत्व दिल्याचे आढळते. भव्यता, आविर्भाव व नाद याने सजीवता येणा-या कवितांत चैतन्य झरझरू लागते. नाद हे कुसुमाग्रजांच्या कवितांचे अजून एक वैशिष्ट्य ..यमक असो वा नसो एक परिपूर्ण नाद त्यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला दिसून येतो.

 त्या पक्ष्याने घरात केले होते घरटे, आणित होता कधी नभांचे तुकडे धूसर

रुतलेले मेणात ढगांच्या नक्षत्रांतिल गीतांचे स्वर..

 चैतन्याकृती हा त्यांच्या कवितेतील एक अजुन महत्वाचा भाग.मूळ आशयाशी असलेला संबंध त्यांच्या उअपमांतुन आविष्कृत करून सजीवता आणण्याची शैली त्यांची. जसं अहि नकुल मधील सापाची गती, त्याचे रूप, त्याचा स्पर्श,त्याची दाहकशक्ती यांचे वर्णन करताना ते म्हणतात.

 ये ज्वालामुखिला काय अचानक जाग, कधि लवचिक पाते खडगाचे लवलवते,

अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, टाकली यमाने कट्यार वा कनकाची

अवतरे मुर्तीमान मल्हारातील तान

 ऊत्प्रेक्षादि अलंकाराची योजना ते करतात. यातील प्रत्येक कल्पना एकाहून एक नवीन अआनि तो सर्प नवनवीन अंगाने प्रतीत करून देणारा आहे. सापाच्या कण्यात मुंगसाचे दात "उल्केपरि तळपत" घुसतात तर सात मराठेवीर "कोसळल्या उल्का जळत सात दर्यांत" असे तुटून पडतात. प्रेमगीतातील तारे "दिमाखात तारे नटोनी थटॊनी शिरी टाकिटि दिव्य उल्काफ़ुले" असे प्रेम व्यक्त करतात. "पिसारा प्रभेचा", "प्रेमाचे ऐश्वर्य" "तेजाची लेणी" या शब्दांतून संवेद्नांची चित्र तर चित्रातील भावनांची धग जाणवते.

कुसुमाग्रज जेंव्हा निसर्गचित्र साकारतात त्यावेळी त्यांच्यातिल आकृती ही अधीक उज्व्ल भासते ती कदाचित त्यांच्या निसर्ग प्रेमामुळे. ते नयनरम्य सौंदर्य कूणाला दाखवू असं त्याला झाळेलं असतं. त्यावेळी मन प्रसन्न करणा-या भावनॆटुन एखादि प्रसन्न कविता पुढे येते. पुन्हा एकदा सकारात्मतेची जाणीव आपाल्यासमोर मांडून कवी एखाद्या म<त्रमुग्ध कवितेचि निर्मिती करतो तो अशी.

 मी एक रात्री त्या  नक्षत्रांना पुसले, परमेश्वर नाही घोकत मनमम बसले

प्रि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी, का चरण केधवा तुम्हास त्यांचे दिसले?

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फ़िरत सदोदित राही

ऊठतात तमावर त्यांची पाउल चिन्हे, त्यांनाच पुससि तू तो आहे की तो नाही !

 अशा मन मोहरून टाकाणा-या अनेक कविता इथे देता येतील परंतू आता संपूर्ण कवितेच्या रसग्रहणाला सुरवात करावी असे वाटते.

 

लेखिका - सुरुचि नाईक  [क्रमश: भाग -३ (किनारा)]

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • ललना लावण्यखणी... +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर +

 • किल्ले बाळापुर +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • जीवेत शरद: शतम +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • निरामया +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • सिंहगड किल्ला +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • पाऊस +

 • 1
 • 2