Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
१) आपल्याला भिती कशाची वाटत असते? आपलं आयुष्य,आपली मिळकत किंवा आपली संपत्ती यापैकी काहीतरी गमविण्याचीच ना? पण जेव्हा आपल्याला कळतं की आपली जीवन कहाणी,जगाचा इतिहास त्या एकाच हातानं लिहिलेला आहे, तेव्हा सगळी भितीच पळून जाते.
-------------------------------------------------------------------------
प्रेम करण्यासाठी कुठलंही कारण लागत नाही.
-------------------------------------------------------------------------
२) एक निर्णय घेणं ही अनेक निर्णय घेण्याची सुरुवात आहे. जेव्हा एखादा मनुष्य निर्णय घेतो तेव्हा तो एका प्रचंड शक्तिशाली प्रवाहात उडीच घेत असतो. हा प्रवाह त्याला त्यान कधीच न पाहिलेल्या स्थळांना घेऊन जातो.
३) तुम्ही कुणीही असा किंवा तुम्ही काहीही करत असा.जेव्हा तुम्हाला मनापासून जे काही करावंसं वाट्तं ते तुम्ही करावं अशी इच्छा विश्वाच्याच अंतरात्म्यात उगम पावलेली असते. ते करण्यासाठीच पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा सगळं जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावून येतं.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.