Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
मंगळ ग्रहावर इजिप्तमधील पिरॅमिडच्या आकाराचे खडक अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाच्या मार्स रोव्हरला दिसले आहे. नासाच्या क्युरिअॅसिटी रोव्हरने मंगळावरील या पिरॅमिड सदृश खडकांचे फोटो काढले आहेत.
मंगळावरील पिरॅमिडसारखे दिसणाऱ्या खडकांचा आकार एखाद्या कारच्या आकारचे असल्याचे बोलले जात आहे. काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की, मिश्रणातून तयार झालेले हे खडक आहेत. मात्र, काही तज्ञांचं म्हणे आहे की, वाऱ्यामुळे खडकांपासून पिरॅमिड तयार झाले असावे.
यूट्यूब चॅनल पॅरानॉर्मलक्यबिकलचा दावा आहे की, हे पिरॅमिड सदृश खडक हे तयार केले गेले आहे. काही तज्ञांचे तर मत आहे की, हे पिरॅमिड्स म्हणजे केवळ पूर्ण पिरॅमिड्सचे टोक आहेत. पूर्ण पिरॅमिड्स तर जमिनीखाली असतील. असे अनेक तर्क सध्या लढवले जात आहेत. मात्र नासाने याबाबत अद्याप कोणतीही शक्यता वर्तवली नाही किंवा दावाही केला नाही.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.