Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
बहुतेक मोठ्या लेखकांचा तारूण्यातला लेखनाचा बहर वयपरत्वे ओसरत जातो. निर्मितीची गती मंदावत जाते. ते अधिक विचारपूर्वक लिहू लागतात.त्यांची निर्मितीही अधिक परिपक्व झालेली दिसते. साधारणतः 'डेव्हिड काँपरफ़िल्ड' लिहिले गेले त्या सुमारास डिकन्सच्या बाबतीतही हेच परिवर्तन सुरू झालेले दिसते. पण आपल्या लेखनाचा वेग मंदावला याचे खापर त्याने कँथरिनच्या कपाळावर फ़ोडले.
घराचा सगळा कारभार कर्तबगारीने निटनेटका चालवणारी, आपल्यावरचा आर्थिक बोजा कमी करणारी अशी कँथरिन त्याला हवी होती. पण प्रत्यक्षातले चित्र अगदी वेगळे होते. लग्नाच्या सोळा वर्षांत तिला दहा मुले झाली शिवाय अधूनमधून गर्भपातही होतच होते. सतत गरोदर तरी किंवा बाळंतीण तरी असलेली कँथरीन सुटत चालली होती. तीच तारूण्य पार ओसरलं होतं. तिच्या अतिशय मोहक आवाजाचं, सुंदर निळ्या डोळ्यांचं आणि सौम्य व्यक्तिमत्वाचं हँन्स क्रिश्चन अँडर्सननेही कौतुक केलं होतं.
पण डिकन्सला बायको म्हणूनही ती आता पूर्वीसारखी हवीहवीसी वाटत नव्हती. शिवाय तिला सारखी मुलं होतात म्हणूनही तो चिडचिडा झाला होता. जणू काय तो तिचा एकटीचा्च दोष होता!वय आणि शरीर सोडलं तर ती पूर्वीचीच होती. सुस्वभावी, उदार. आपल्या नव-याला हेच गुण इतके प्रिय होते, मग आताच आपण त्याला अगदीच आवडेनासं कसं झालो हेच त्या बिचारीला कळत नव्हते.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.