Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
माझ्या कवितेला दिल पावसाच मी नाव
फुला पानानाही कळाला या शब्दांचा भाव
वार्यासंग डोलु लागली चाफ्याची ही कळी
पावसाच्या सरीमधे लिहिल्या मी या ओळी
विज कडाडुनी सुरु झाला ढगांचा अभंग
शब्दा शब्दातुन वाहु लागला मातीचा सुगंध
थंडगार वार्याने शांत केला उन्हाचा प्रभाव
माझ्या कवितेला दिल पावसाच मी नाव
आकाशाच्या मंडपाला होत इंद्रधानुच तोरण
सैराटवानी मोहरल होत घरच आंगण
सर सर सर सर बरसल्या नभातुन सरी
ओलचिंब केल रान निजल्या डोंगरावरी
थेंब थेंब पाणी पिउन सुखावली धरणी
हिरवगार झाल रान दिसे चहुकडे पाणी
लहान लेकरुवानी तो असा मातीमधे सामवुन गेला
झाड फुल प्राणी पक्षी सगळ्यानाच भिजवुन गेला
कोवळ्या फुलासारख दिसु लागल माझ गाव
माझ्या कवितेला दिल पावसाच मी नाव
पाऊस माझ्या गावकड दरवर्शीच पडतो
कधी रिमझिम लहरी कधी मुसळधार कोसळतो
सार्या गावसोबत माझे मन तो बेधुंद भिजवतो
कोणी काहिहि म्हणो मला पाऊस खुप खुप आवडतो..
-- सुहास दि. काकडे
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.