Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
लहानपणीची आई अशी बडबडी, खाऊसाठी पैसे देणारी...बरीच आठवते. एकदा एक पाटकोडगे बाहूले तिने दिले. ते पडले तरी पुन्हा उठून बसायचे. त्यावर ती म्हणाली, 'आयुष्यात असेच पराभवाचे, भुईसपाट होण्याचे प्रसंग येतील. पण त्यांनी भिऊन जाऊ नकोस, शरम वाटून घेऊ नकोस.हरलं तरी पण माणसासारखं लढणं हेच जीवनाचं दुसरं नाव..'
बाबांनी एकदा भिकारयाला सर्व पैसे देऊन टाकले. तरी पण रडत बसले तेव्हा त्यांची आई म्हणाली, आता का रडतोस? तेव्हा काय वाटलं ते शब्दांत पकड्ण्याचा प्रयत्न करीत बाबा म्हणाले, 'त्या भिकारयाजवळ खायला पैसे नाहीत अन आपल्याजवळ नुसत्या फ़टाक्यांसाठी एवढा खुर्दा. तेवढ्यात त्याची अनेक दिवसांची भूक भागेल. असं का असतं गं आई?
आपल्याजवळ पोटभर अन्न अन तो उपाशी. असं का देवानं करावं?'
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.