LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5)

कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5)

0.0/5 rating (0 votes)

किना-यानंतर कुसुमाग्रजांची राष्ट्रीय जाणीव पुन्हा एकवटून आलेली दिसते ती "हिमरेषा" या काव्य संग्रहात. चीनी आक्रमणानंतरचा हा काळ. सामाजिक जीवन व भोअवताली घडणा-या घटनांच्या प्रतिक्रीया कुसुमाग्रजांच्या कवितांवर आपली छाप ठेवतात हे विशाखा नंतर पुन्ह एकदा सिद्ध झालं ते हिमरेषेतून.चीनी आक्रमणा विरुद्ध त्यांच्या मनात पेटलेली आग ही जळजळीत काव्याच्या रुपात बाहेर पडली ती आवाहन, रक्त तुझे हे, क्रोध या कवितांमधून. वाग्देवीचा आशिर्वाद सततच लाभलेले कुसुमाग्रजांचे कौशल्य विशाखे नंतर तितक्याच प्रकर्षाने साठून आले ते हिमरेषेत.. वेचक नेमेके शब्द, भव्य कल्पना आणि कठोर वर्णातून उसळून येणारा आवेश हिमरेषेचे वैशिष्ट्य ठरले. आवाहन सारख्या कवितेत कवी वाचकाला आपल्यात सामवून घेतो, आपल्या ताब्यात घेतो आणि यासाठी कवितेच्या पहिल्य दोन ओळीच पुरेशा असतात.

आवाहन-

बर्फ़ाचे तट पेटूनी उठले सदन शिवाचे कोसळते

रक्त आपुल्या प्रीय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

शिव आणि माता हे भारतियांचे निस्सिम श्र्द्धास्थान..त्यांचेच अस्तित्व धोक्यात असल्याची जाणीव अत्यंत कठोर शब्दात ्करून देवून निद्रिस्त भावनेत जाग करऊन..नव्हे तर अचेतनास चैतन्य देणारी ही कविता कोणाल कृतिशीलता दे्णार नाही? कुसुमाग्रजांच्या समर गीतांतील ऐतिहासिक प्रतिकं आणि ती रचनेत ओअवण्याची कलापुर्णताच इतकी विलक्षण आहे की या कवितांधे असलेली प्रचाराची पातळी ही थेट संस्कारांच्या पातळीवर जाऊन बसते.

राष्टीय पातळीवरील अनुषंगिक प्रश्नांना मात्र कुसुमाग्रजांची कविता तितकी भावली नसावी. तिथे त्यांची काव्यफ़ुलं फ़ुललेली दिसत नाहीत. संघर्ष व आवेश हे कुसुमाग्रजांच्या दृष्टीने त्यांच्या काव्याचेप्रेरणेचे बळ होते.

हौतात्म्य भावनेचे कुसुमाग्रजांना अत्यंत आकर्षण! ज्ञात इतिहासाचे सुत्र प्रभावी पणे मांडणारी ही कविता. प्रतापराव अगुर्जराने रणात पाठ दाखवल्याचे कळताच महाराजांनी त्यांना पाठवलेले जळजळीत पत्र, पत्रातल्या एकेका अक्षरांने मनात उसळेला काहूर, पश्चातापाचे झरे, त्यातून आलेले वेड आणि मग सरदारासंह केलेली निर्वाणीची घोड्दौड, छावणीतला हला, रणधुमाळीच्या वण्व्यात प्राणांची करून घेतेलेली घेतलेली होळी असे एक एक प्रसंग चित्ररुपाने उभी करण्याची , चेतवण्याची अभूतपूर्व प्रतिभा फ़क्त कुसुमाग्रजांची!

"सात" ह्या कवितेची थोरवी मराठी मनांपर्यंत्च मर्यादित राहत नाही तर त्याही पुढे जाते. 

 अद्याप विराणी कुणि वा-यावर गात

 ही कवितेची शेवटची ओळ आपल्या अंतकरणात तीच विराणी घेऊन येते सात-

 वेडात मराठे वीर दौडले सात!

"श्रुती धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता, रण सोडूनि सेनासागर आमुचे पळता

अबलाहि घरोघर ख-या लाजतील आता, भर दिवसा आम्हा दिसू लागली रात"

वेडात मराठे दौडले वीर सात...

केवळ पहिल्या कडव्यात महाराजांच्या पत्रातील हळहळ व तो जळजळून करणारा आवेश सामवून घेऊन पुढे सरळ मुद्याला येणारी ही कवीता

 ते कठोर अक्षर एक एक त्यातील, जाळीत चालले कणखर ताठर दील

"माघारी वळणे नाही मराठी शील" विसरला महाशय काय लाविता जात?"

वेडात मराठे वीर दौडले सात!, वर भिवई चडहली दात दावती ओठ

छातीवर तुटली पटबंदाची गाठ, डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ

म्यानातुन उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात

 कडव्या कडव्यातून क्षणक्षणाचं चित्र उभं करत शेवटी - खग सात जलाले अभिमानी वणव्यात... या ओळी मनाला हलवून सोडतात. त्याही पुढे कवी म्हणतात-

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वा-यावरी गात

वेडात मराठे वीर दौडले सात! 

हिमरेषा यातील इतर कविता मात्र मागील आशयास पुन्हा प्रज्वल करणा-या आहेत. त्यात तेच आकर्षण व तोच भाव पुन्हा आलेला दिसतो.

 मी म्हणोनी सोडीला तो, नाद आता मंझिलाचा

चालण्याचे श्रेय आहे, अन्य धर्माचार नाही

 ह्या ओळी वाचताना पांथस्थ या कवितेची तसेच गती या कवितेची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. मूलच्या अंतविश्वाला तडा न जाऊ देता, तोच भाव पुनर्रचनेत नाविन्याने मांडण्याची कला कुसुमाग्रजांना अवगत होतीच.कुसुमाग्रज बहुधा पाल्या कवितेची जात पडताळून पाहात असत असे भासते. ते स्वत:लाच सांगतान जणू म्हणतात-

 पुन्हा पुन्हा बघ तुला सांगतो, पिटामध्ये मी आहे बसलो

तयार तेथे बसावया तू? म्हणशील ना तर आम्ही फ़सलो?

असे उद्गार ते आपल्या स्वत:ला किंवा कदाचित त्यांच्या चोखंदळ वाचकाला करत असतील. मात्र ह्या अशा आत्मपरिक्षनणाचा विचार आपल्या मनात येतो न येतो तो त्यांचा काही ओळी आपल्याला त्यांच्या आत्मपरिक्षणाच्या विचारापसून पार दूर घेऊन जातात त्या अशा--

मी शब्दांच्या घालुनि बसतो अमाप राशी, जखमी होता धावत जातो शब्दांपाशी

शब्दच झाले मालक आता सर्व जिण्याचे, जनावराने काबिज केला हा दरवेशी 

 लेखिका - सुरुचि नाईक

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • किल्ले बाळापुर +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • जीवेत शरद: शतम +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • 1
 • 2