Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
1) चैत्रात नदी कृश होते.नव्या पालवीचा गंध नदीपर्यंत येतो.चंदन ज्ञान्ग्राह्य करण्याची क्षमता वाढविणारे महत्वाचे साधन आहे. वृत्तीवर ताबा राहतो. मनाचा तोल सहसा बिघडत नाही. ज्ञान चर्चा सुगंधित होते. चंदनपूजा ज्ञान साधते व ब्रम्हसाधनेत मोलाची आहे. आयुष्याला दिव्य गंध लाभतो.
2) वृक्ष ,वनस्पती आणि सृष्टीतील प्राणीमात्रांशी संवाद साधता येतो.या सर्वांचे बीज आपल्या प्राचीन ग्रंथातून आढळून येते. जंगलात भ्रमंती करताना तुम्ही जंगली जनावरांना भ्यालात की ते तुमच्यावर हल्ला करतात.निर्भय माणसांना त्यांच्या पासून धोका नसतो.हे सुत्र देखील लक्षात ठेवण्यासारखे आहे.
3) बासरी वाजावी तशी झाडं बा-यांनी वाजतात.वारा शांत असतो,पण झाडांना त्यानं स्पर्श केला की शेकडो बासरीच्या नादाप्रमाणं पुरातन वृक्ष गाऊ लागतात.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.