Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
"रत्नागिरीतील भन्नाट कातळशिल्प, जिथे होकायंत्रही होतं दिशाहीन!"
रत्नागिरीतल्या देवाचे गोठणे या भन्नाट जागी पोहोचल्यानंतर मती गुंग होते. अनामिक आणि अगम्य अशा जगात आपण आपोआपच ओढले जातो आणि डोक्याभोवती घोंघावत राहतं इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी उठणाऱ्या प्रश्नांचं मोहोळ.
रत्नागिरीतल्या देवाच्या गोठण्यातल्या कातळापर्यंत पोहोचण्यासाठी जी पायपीट करावी लागली. त्याचा शीण इथं पोहचताच निघून जातो. कारण कुतुहलालाही कुतुहल पडावं अशी असंख्य कातळ शिल्पांची रांगोळीच समोर दिसते.कातळावर कोरलेली चित्रं माळरावानवर विखुरलेली आहेत. कुठे फक्त दोन, कुठे एकाच ठिकाणी 30 ते 40.
देवाचे गोठण्याच्या या माळावर एक शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. त्याचं नाव आहे रावणाचा माळ रावणाच्या माळावर होकायंत्र लावलं जातं. पण ते चालत नाही. कोणतीही गोष्ट चिरंतन नसते या न्यायाने इथंही शिल्पांना धक्का बसला आहेच. काही शिल्पं तर काळाच्या ओघात गावातल्या रस्त्यांमध्ये विरली आहेत. तर काही आंब्याच्या बागांनी उद्ध्वस्त झाली आहेत.
देवाच्या गोठण्यापासूनच काही अंतरावर राजापुरातलं सोलगावचं पठार आहे. इथंही कातळ शिल्पं आहेत. पण देवाच्या गोठण्यासारखी अगम्य नाहीत. इथं वाघ आहे बैल आहे डुक्करही आहे.
इथून जवळच असलेल्या बारसूच्या सड्यावर तर एक अप्रतिम शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. त्याचं नाव आहे लज्जा गौरी. इतकं मोठं शिल्प कोणत्याही आधुनिक साधनांविना कसं तयार केलं असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
कोण होते हे अनामिक शिल्पकार? त्यांनी अशी शिल्पं का तयार केली? भविष्यातल्या जगाला त्यांना काही संदेश द्यायचा आहे का? इथं आल्यानंतर अशा अनेक प्रश्नांचं काहूर उठल्याशिवाय राहात नाही.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.