LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
त-हेवाईक कोर्ट

त-हेवाईक कोर्ट

0.0/5 rating (0 votes)

भारतातील न्याय व्यवस्था आदर्श मानली जाते असे जर एखादया सत्तरीतल्या म्हातार्यायला ज्यांनी कोर्टाची पायरी 20-30 वर्षे झिजवली आहे. अशा अभाग्याला सांगीतले तर तो भर चौकात दगडानी डोके फोडून घेर्इल. ‘आता विश्वास फक्त न्यायालयावरच ठेवण्यासारखा आहे कारण राजकारणी, पत्रकार, शिक्षक, सारेच बरबटलेत’ असे आम्ही छाती पुढे काढून सांगतो. वर्तमान पत्रात नाहीतर टीव्हीवर रोज राजकारण्याला नाहीतर सरकारला कोर्टाने फटकारले हे आपण अनूभवतोच. आत्तातर खड्डे केव्हा भरायचे, दांडीया कधी बंद करायचा, गाडया कशा चालवायच्या, नोकर भरती कशी करायची, सण कुणी करायचे, वंदेमातरम का म्हणायचे, पेप्सी कोणी घ्यायची असे सारेच कोर्ट ठरवू लागलेय. दोष कोणाचा? कशातही, कोणत्याही विषयावर निर्णय देणार्यास कोर्टाचा? प्रसिध्दी मिळवीणार्याा न्याय व्यवस्थेचा? की उठसूठ कोणत्याही कारणांवर जनहीत याचिका दाखल करणार्या‍ वकील मंडळींचा?

मला येथे न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करायचे नाहीत व एक वकील असूनही न्यायालयावर टीका करून अपमान प्रकरण ओढवून घेण्याचे नाही. पण ही अनेक सामान्यांची भावना आहे. रस्त्यातील खड्डे कधी बूजवायचे हे काय कोर्टानी ठरवायचे? का वरीष्ठ अधिकारी बसून बसून पगार घेणार? त्यांचे ते काम नाही. हजारो विषय महत्वाचे असताना शेकडो न्यायालये वाढवूनही कामे तूंबलेली असाताना कोर्टानी हे असे विषय हाताळायचे? पण कोर्टानी निर्णय देर्इ पर्यंत सरकार कामाला लागत नाही ही वस्तूस्थिती आहे.

मंत्रालयाचा तुम्हाला अनुभव असेल तर मंत्री फक्त हायकार्टाला घाबरतो. त्याला एखादी फार्इल अडकवून ठेवायची असेल तर कधीतरी तोच एखादयाला कोर्टात जायचा सल्ला देतो. केवळ बाब न्यायप्रतिष्ठ आहे म्हणून अनेक कामे सरकारी ऊंबरठयावर अडलेले आपण रोज पहातो. कोर्ट नावाचं हे अजब रसायन आहे. त्यांचे किस्से तर एकापेक्षा एक, बरीच कोर्ट वकीली क्षेत्रातून आलेली. तेथले अनुभव, राग लोभ कुठेतरी खोलवर रूजलेले असतात. शिवाय माणूस म्हणून, समाजातील एक सदस्य म्हणून रोजमर्या च्या जीवनात काहीना काहीतरी न्यायाधिशांचे घरात, आजूबाजूला घडतच असते. त्यांनाही मूलांच्या करीअरची चिंता असते, त्यांचाही गॅस संपतो, कुणाची पत्नी खाष्ट असतेच, कुणाच्यातरी भावानीच प्रॉपर्टी हडपलेली असते. कधीतरी फार पूर्वी पोलीसी खाक्या कुणीतरी अनुभवला असतोच. पेपर टीव्ही त्यांच्या मनावरही दडपण आणत असतो. त्याचा कळत नकळत परीणाम खोलवर आंतर मनात झालेला असतो. या कडू-गोड आटवणी केव्हातरी अफाळून येतात. प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगळा, काही जण जातीसाठी हळूच मऊ होणारे, काहीजण घरचा राग कामरवर काढणारे जाणवतात.

व्यक्ती तितक्या प्रवृती असे असले तरी आम्ही मात्र न्यायाधिशांनी काळा कोट घातल्यावर सारं काही विसरायचे अशी भोळी अपेक्षा करायची. परीपूर्ण आदर्श न्यायालय अजून मला तरी भेटलेले नाही. अनेकांमध्ये अनेक गूण होते. पण प्रत्येकात काहीतरी कमी होतेच, आता हे ठरवणारा मी कोण? अशी समजूत काढून मीच स्वताची जीभ चावायचो. उगाच फटकळपणे कुठेतरी काहीतरी बोलायचो आणि आमचा प्रतिवादी वकील चेंबरमध्ये जाऊन कुणाच्यातरी कानी लागायचा? माझ्यासारखा विचार करून कुणीही वकील स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेत नाही. व्यवहारीपणे जो तो निकालाशी मतलब ठेवतो एखादाच डेरींग करून साहेबांना ‘सूनावतो’ पण सरते शेवटी सुनावीणाराच मूर्ख ठरतो. तो स्वत:बद्दलचे मत वार्इट करून घेतो. आणि अगाव ठरतो. न्यायालये पण तर्हेावार्इक असतात या सर्व काल्पनिक गोष्टी वाटाव्यात अशी माझी इच्छा असल्याने त्यांचे वर्णन आणि प्रकरणे सवीस्तर देता येत नाही.

एक न्यायाधिश निवृत्तीनंतर वाढीव मुदतींवर आलेले, स्वत:ला समाजसुधारक म्हणविणारे, पेपरातून नावासहीत दुनियेला अध्यात्म शिकविणारे, ज्या पेपरात लिहायचे त्यांच्यावर मेहरनजर ठेवणारे, एखादयावर ठरवून राग काढणारे, ज्ञानेश्वरीतील अर्थ समजवून सांगतानाच त्यांचे बरोबर विरूध्द जीवन जगणारे, हे योगी महाराज! स्वत: तर वकीलीत फार चमकले नाहीत पण खुर्चीवरून वकीलांना कळतच नाही अशा गर्वात वावरणारे त्यांच्या समोर एखादयांनी पंगा घेतला की त्याचे मागे हात धूवून लागणारे होते. पूढे निवृत्तीनंतर पुन्हा न्यायाची याचना करत त्याच कोर्टात निर्लजपणे घूटमळत होते. खाली मान घालून यस यूअर ऑनस बोलत होते.

एक कोर्ट तर स्वत:चेच तालात चालणारे! आपले कोण वाकडे करणार! असे दाखविणारे होते. त्यानाही शेवटी नाक मूठीत धरून वकीलीत परत यावे लागले. एक तर सकाळी 11 वाजताच कर्तव्य कठोरपणे अपीले वकील नाहीत म्हणून फेटाळणारे, एका जातीच्या वकीलांना सांभाळणारे, पेपरातील बातम्या वाचून त्याचा परीणाम ऑर्डरवर करून घेणारे होते. एक तर अध्यात्माचे नावावर पूस्तके लिहीणारे, जाहीर कीर्तने करणारे आणि एकीकडे माया जमवणारे हेाते. त्यांना नंतर घरी बसावे लागले अशी चर्चा होती. एक एकाच वेळी 3 ते 4 विषय हाताळणारे हुषार पण चंचल, त्यामूळे काम विस्कळीत करणारे होते. पण पूर्ण प्रामाणिक असल्याचा गर्व, दूराभिमान बोलून दाखविणारे होते. एक महाभाग मोठया मोठयाने ‘शो’ करणारे डॉयलॉग झोडणारे, जगाचा सुधारण्याचा ठेका आपल्यालाच आहे असे समजणारे होते. रोज संध्याकाळी आख्या गावाला तरा तरा चालत प्रदक्षिणा मारणारे.

कांही भ्रष्टाचारी तर काही अती प्रामाणीक, काही संयमी तर काही उतावीळ, काही सोर्इने वागणारे, संभाळून घेणारे तर काही वकीलांशी दोस्ती करणारे, काही एकत्र बैठका करणारे तर काही वकीलांच्या मयतालाही न येणारे, काही कर्तव्याच्या बंधनात दबलेले तर काही शिस्तीच्या चाकोरीत दबलेले पण बाहेर पडू पहाणारे, काही नाही म्हणून जादा कमविणारे तर काही तत्व म्हणून एकवेळच जेवणारे. दोन्ही प्रकार न्यायालयात पहायला मिळतात.

ब्रिटीशांनी न्यायव्यवस्था रचली तेव्हाची सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक परीस्थिती वेगळी होती. तेव्हा न्यायाधिशांकडून वेगळया अपेक्षा होत्या. नव्हे तेव्हा कायदा रचताना उद्देशच वेगळे हाते. आपण आजही तेच कायदे कानून उगाळत बसलोय. परिस्थीतीनुसार काही कायदयांत आपण बदल केलेत, दूरूस्त्या केल्यात पण मूळ गाभा तोच रहीलाय.

पूर्वी कोर्ट समाजापासून दूर रहायची त्यांनी दूर ठेवून त्यांचे श्रेष्ठत्व समाजानी मान्य केले होते. आता सामान्यांचे सर्वसाधारणपणे न्यायव्यवस्थेबद्दल फारसे चांगले मत नाही. कारणे काहीही असतील, पोलीस यंत्रणा दुबळी असेल, भ्रष्ट असेल, कोर्ट कर्मचारी व वकील कामचुकार असतील, काही पक्षकार अप्रामाणीक व लबाड बुध्दीने कोर्टात प्रकरणे लांबविण्यात ठेवण्यात यशस्वीसुध्दा होत आसतील. तारीख पे तारीख या चक्रात पक्षकार अडकत असतील. तडजोड करून फायदा नाही म्हणून प्रकरणे निकाली निघतही नसतील पण पुन्हा एकदा नव्याने सक्त आचारसंहीता न्यायालयांसाठी बनवणे आणि तिची बजावणी होणेच गरजेचे आहे.

जज्जसाहेबांनी डायसवर बस त्यावर कुणाचीही अवांतर बाजू न घेणे, पक्ष, जात धर्म या पलीकडे जाउन नि:स्प्रुहपणे व तटस्तपणे काम करणे, कोणत्याही फायदयाची अपेक्षा न करणे, न चालणार्याज कामाना तारखा देऊन मोकळे करणे, टार्इमपास करण्याच्या, वकीलांविरूध्द सक्तीने वागणे, अवांतर चर्चा न करणे, मतप्रदर्शन व वायफळ विधाने टाळणे, अती शिस्तप्रियता दाखवून पक्षकारांचे नुकसान न करणे, वकिलांना संभाळून घेताना एखादयाचे फाजील लाड न करणे, एखादया वकिलाबद्दल पूर्वग्रह दूषीत होऊ न देणे, समाजात मिसळताना आपल्याकडून काही चूका होणार नाहीत याची काळजी घेणे. मुख्य म्हणजे गैरसमाजाला आणि अपप्रचाराला बळी न पडणे, आकर्षणे टाळणे, व्यसनापासून सक्तीने लांब रहाणे, दुसर्यारवर टिका टाळणे, आपल्या दैनंदीन गरजा मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर मानाने स्वत:हून पायऊतार होणेही गरजेचे आहे.

जिल्हान्यायालयात आणि तालूका कोर्टात अनेक जज्ज बदलून येत असतात. त्यांच्या मुलांचे अॅडमिशन पासून ते गॅस कनेक्शन पर्यंत त्यांना तत्परतेने मदत करणारे वकीलही तितकेच दोषी आहेत. नाकांनी कांदे सोलून आपला फायदा करून घेणारे काही वकीलच न्यायव्यवस्था सोडवायला मुख्य हातभार लावतात.

न्यायदानात शिरताना आपल्याला मर्यादीतच पगार मिळणार आहे. त्यातच आपले कुटुंब चालवायचे आहे. आणि दुसर्याीचे वैभव पाहून आपल्याला आसुया होता कामा नये अशी खूणगाठ प्रत्येक जज्जानी आपल्या मनाशी बांधली पाहीजे. आजही तत्वनिष्ठ जज्ज आहेत पण त्यांतीलच काहीजण इतरांचे प्रताप पाहून कुढत रहातात. त्यांची प्रामाणिकपणाची ‘वैफल्यग्रस्तता’ मग त्यांच्या कामातून डोकावते. शेवटी तेही आदर्श असून या न्यायदानात नापास ठरतात. समाजातील अनिष्ठ आकर्षणाचा परिणामही अनेकांवर होतो. आज पुन्हा न्याय व्यवस्थेची झाडा झडती होण्याची गरज आहे. काही वकील काही जज्ज यांना या व्यवस्थेतून बाहेर काढण्याची गरज आहे. पण तसे होत नाही आणि होणार ही नाही. मर्जी संभाळण्याची रोज नवी नवी तंत्र सर्वच जण अवलंबत असतात.

न्यायालयातही ‘मन’ असते. त्याच्या जीवनातील चढ उतार, राग लोभ, अपमान नोकरीतील अनुभव, घरचे प्रश्न, त्यांचा पूर्व इतिहास यांचा परिणाम, न्यायालयाची तत्कालीन गरज आणि त्यांचा मूल्यमापन करावयाची कूअत याचा प्रत्यक्ष परिणाम निकालावर व त्यांच्या न्यायालयीन कारकीर्दीवर, रोजचे वागण्यावर होत असतो.

या जगात सर्व गुण संपन्न कुणीच नसते पण तसे आदर्श बनण्याचा प्रयत्न न्यायालयांनी नाही करायचा तर कुणी करायचा? न्यायालयीन मर्यादा आणि न्यायदानातील मर्यादा या दोन्ही गोष्टी आत्मसात करताना दोघांच्या मधील फरक समजून घेणेही आवश्यक आहे. थोडक्यात जज्ज निरिक्षक, तटस्थ, संयमी असावा. त्याचेकडे न्यायदानातील अचूक निर्णय क्षमता असावी. अभ्यास करून भांडणाचे मूळ शोधण्याची आणि वाद सर्वमान्य पणे समूळ नष्ट करण्याची वृत्ती असावी. हे बोलणे सोपे असते पण प्रत्यक्ष आचरणात आणणे अशक्य असते.

लोकन्यायालयाचाही पूनर्विचार करण्याची गरज आहेच न्यायालयाचा दर्जा मिळालेली अन्य ठिकाणे, टॅ्रब्मूनल, ग्राहकमंच, सरकारी अधिकारी यांची मानसिकता, त्यांची न्यायपध्दती यांचेवरही निगराणी ठेवणे गरजेचे बनले आहे. यातील कोर्टाचा दर्जा मिळालेल्याची तर्हेावार्इक पणाची संख्या जास्त गंभीर आहे. न्यायालयावरील जनतेचा विश्वास उडतोय, त्यांच्याबद्दलही चर्चा होऊ लागली आहे हेच एकंदर गंभीर आहे. पण जागे व्हायचे कोणी? आणि गळयात घंटा बांधयची कोणी?

-- विलास नाईक 

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • त-हेवाईक कोर्ट +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • अपेक्षा +

 • पाऊस +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • 1
 • 2