हे ओवळा, रम्य उखी पिवळ्या उनेत
होतास मंदाक्ष्ररे,अनिले गुंजीत।
आहा। हं । मार्दत्व नयनांस वेधे
चारू सुगंध, दिग्भरित मना सुखादे॥

स्वेच्छे,केशरे रेशमी घेत झोके
तया गात गीते,अली त्या क्षणाते।
अहाहा। सुहास्या तुझ्या बघावे
हरूनी मन:स्ताप, तोषीत व्हावे॥
नव्हेची सुमा तूं, जणू तोष आहे,

नव्हेची उषा ती, हर्ष काळ आहे।
रमलो तुझ्याती , पिवळ्या सकाळी,
परि तोष तो,न ठेला त्यावेळी॥

अशा हास्याते बहूसमय पहात असता
तरूची फ़ुलेही गळती धरणीला न कळता।
तधी माझा 'संतोष' गळोनी,शल्येही उपजले
अरे हे ओवळा,परिमलच। हास्य न स्थिरले॥

(शब्दार्थ :- ओवळा -बकुळी , अनिल-वारा, चारू-मोहक ,अली -भूंगा ,शल्ये-दु:ख, परिमल-सुगंध, दिग्भ्ररित-चारही दिशा )

--- अशोक लंगडे