तुझ्या स्मृतीच्या माळरानावर

माझी स्मृती फ़ुलु देत
एकदातरी प्राजक्तासारखी।

उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,
भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।
पुसुन टाक काजव्यांचे थारोळे
चांद्ण्यांचे सडे पडू देत।

पण पिचलेल्या देहावर
करू नकोस नर्तन कारण...
माझ्या सकाळच्या गर्भाची पुष्पच
उमलायची आहेत अजून-

--- अशोक लंगडे