हे ओवळा, रम्य उखी पिवळ्या उनेत
होतास मंदाक्ष्ररे,अनिले गुंजीत।
आहा। हं । मार्दत्व नयनांस वेधे
चारू सुगंध, दिग्भरित मना सुखादे॥
तुझ्या स्मृतीच्या माळरानावर
माझी स्मृती फ़ुलु देत
एकदातरी प्राजक्तासारखी।
एक टिंबवलय...
अर्भकाचे निसटते क्षण
बेंबीच्या देठाशी असलेले नाते
फ़ुलारलेले नवजात....
कां आताही शेष आहे शोध
किना-यास लागे मन
कां बघतो इतुक्या कौतुकाने मंथन झालेल्या
सागराला.
--- अशोक लंगडे
निसर्गात फ़ळा- फ़ुलांची मजा चाखताना
विहरता स्वच्छंद, आकाशी मजेत
स्वच्छ, हिरवे,पोपटी,लोकरी पंख त्याचे
चोचेत चोच व हाक देण्याची आतुरता
काजव्यांचे रोप पेरुन
घेवु पहातो पीक चांद्ण्यांचे
पण फ़ुलली असते निराशाच
निष्क्रीय गाजर गवतासारखी
माह्या गावचा गा वड
होता जव्हा भर जवानीत
वड सायीत्रीच्या दिशी
त्याले बाया गा पुजत
काय ल्याहाव पावसाचं,
मले काई कयत नाय.
बोल्याचं त खुप काई,
पण मले काई जुयत नाय...
भिंतीच्या उलगडल्या रेघा
लई दिस झाले, नाही मारला चुना
पावसाचं आड्यातुन गळते पाणी
लई दिस झाले, नाही फ़ेरलं आडं
आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा
आज ढ्गाआड लपू नकोस
सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच
ओलं दंव टिपू नकोस
विखुरल्या स्वप्नातील कळ्या,
सांत्वन तरीही देत राहिलो
बुडले रे सर्व किनारे,
नाव तरीही वल्हवित राहिलो.
किती घेशील आढेवेढे,
तुझ्या पैंजणातूनच
झळकणार तुझी प्रिती.
घुंघरू अबोल का कधी?