माह्या गावचा गा वड
होता जव्हा भर जवानीत
वड सायीत्रीच्या दिशी
त्याले बाया गा पुजत

माह्या गावच्या वडाची
साल किती गा पवित्र
ओ गा! बाया पुजे त्याल्रे
कुत्रे चाट्ते मात्र-

रातीच्या पायरी ज्याच्या खाली
गाण्याचा फ़ुटे पान्हा
तिथं गा दुपारच्या संजेले
एखादं पाखरू बी टेकेना

जिथं पाह्यलं होतं
त्या देवाच गा ठाणं
तिथच पाह्यणं आलं
भुताट्कीचं मशाणं

माह्या गावचा वड
झाला गा म्हातारा
जिथं ज्याले चाले पुजा
फ़िरे तिथं लोखंडी आरा

गावच्या वडावर वाजते ड्फ़
राह्यते बांगड्या किणकिणत
वड - सायीत्रीच्या पुजेले
आता बाया दुस-या वडाच्या शोधात-

--- अशोक लंगडे