काय ल्याहाव पावसाचं,
मले काई कयत नाय.
बोल्याचं त खुप काई,
पण मले काई जुयत नाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

तु आली नाय, पाऊस बी.
काय आहे नातं तुय?
थो न राह्यत एका ठायी,
पन तुह्य मले कयत नाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

परसातली तुयशी सुकली,
सुकडे सारे पानं भाय.
पण माह्या कायजाचं काई?
तुले काई जडत नाय....

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

सुकलं सारं नदीचं पाणी,
सारं जीवन रेती काय?
पावसाचा त विरह बाणा,
पन तुह्य काई वळत नाय....

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

पिरती झाली तार तार,
तुह्या साठी मराव काय?
पिंजारलं काईज माह्यं,
दे माय धरणीठाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

ये तु ,पावसासकट.
हिरवी होईन धरणीमाय.
पावसातच गाऊ अन न्हाउ.
पाऊसच सारं सारं, काय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

--- अशोक लंगडे