पुन्हा पुन्हा आठवतात
तुझे अतृप्त डोळे
आणि--
तुझेच घायाळ स्वप्नपक्षी

कां रे असे अश्रू ढळते?
कां रे मग भग्न हृदय जळते?
अश्रूंना नसते नाव
दूर दूर तुझे रे गाव..
शृंगारून बसला जीव
येणा-याचा ना ठाव .....

--- अशोक लंगडे