भिंतीच्या उलगडल्या रेघा
लई दिस झाले, नाही मारला चुना
पावसाचं आड्यातुन गळते पाणी
लई दिस झाले, नाही फ़ेरलं आडं

आंगणातली चुरमडली तुळसी
झडले सारे पानं
शेतातलं पीक सारं
गेलं करपून

सांजेचा दिवा जळते कहिभहि
फ़ोडणीलेच तेल आता सापडत नाही
मिरगाचे दिस आले शेतीत टाकाचा दाणा
पैशाले तं भहीन! सावकार चाले उताणा

कसे दिसं पाह्यले,आता येते लळू
बुढी बी राहून लळते मुळुमुळु
बळीराजाले पाहा कसे दिसं आले
मायबाप सरकार काय करते मंबईले?

राघोबा तं गेला,आता माही कां बा वाट?
बळीराजाचा कां आता ? असाच परिपाठ ?

--- अशोक लंगडे