आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा
आज ढ्गाआड लपू नकोस
सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच
ओलं दंव टिपू नकोस

माझी प्रिया येणार आहे
ती आल्यावर लाजु नकोस
आणि तीच लाजली तर....
सांगून ठेवतो माझ्या आधी
उगाच तूच सजू नकोस.

--- अशोक लंगडे