विखुरल्या स्वप्नातील कळ्या,
सांत्वन तरीही देत राहिलो
बुडले रे सर्व किनारे,
नाव तरीही वल्हवित राहिलो.
अश्रू भारले नयन पुसत,
भुतकाळ तसा आठवीत असा
किरण आशेचा शोधत,
मार्ग निघालो असा कोरीत असा.
कधी चांदण्यांनी सुखावलो नाही,
काजव्यांचे नशीबी थवे
"ज्योती" ही विझता तरी,
तेववीत राहीलो दिवे...
पेटविता ज्योत् विझत गेली ,
"शुभंकरोती"स्वर विरता विरता
मैदान ओस पडत गेले,
वाट आषाढाची बघता बघता.
वैशाख वणवे पेटले रे जीवावर,
आषाढा! तहान भागव या चातकाची
चांदणे अन लखडू दे मनात माझ्या,
फ़ुलव, पहाट माझ्या आयुष्याची.
--- अशोक लंगडे