किती घेशील आढेवेढे,
तुझ्या पैंजणातूनच
झळकणार तुझी प्रिती.
घुंघरू अबोल का कधी?
सग्यांचा संसर्ग हासरा,
विश्व सगळे छळणामय.
पाण्याची आस तॄष्णेला;
मेघ बरसणार ना कधी?
कधी प्रेमाने, तर कधी बळे,
शिकवितो समय- साधन....
काही न मिळते समया आधी,
काळ थांबतो का कधी?
मधुचंद्राचा चंद्र शिरावर,
पदर ओसरतो रातभर.
अशातही कुणी रडला,
दुःख ओसंडणारच ना कधी?
--- अशोक लंगडे