विस्म्रुत कशी होईल?
ती धनतेरसची रात्र आणि-
आलिशान इमारतींवर
जगमगणारे दिप !

विस्मृत कशी होईल ?
माझ्या कुटीतील
ती विना दिव्याची रात्र
आणि-

शिळ्या भाकरीला
शेकताना चुल्ह्यात
जळणारे अश्रू !

चू्क तर माझीच
मी जगमगणा-या इमारतींना
डोळ्यात भरून घेतल

--- अशोक लंगडे