एक टिंबवलय...
अर्भकाचे निसटते क्षण
बेंबीच्या देठाशी असलेले नाते
फ़ुलारलेले नवजात....
एक ब्रम्हांड....
उंच गगनाशी उड्डान
झेपावणा-या आकांक्षा
बहरलेले यौवन.......
एक सूर्य....
सुकनारे नदीचे जल
वर्षावणारे ढग
पल्लवित जीवन......
एक पूर्णविराम....?
घरंगळलेले आयुष्य
विसावलेले हृदय
निर्ढावलेला मृत्यु......
पुन्हा टिंबवलय......
जन्म घेतं
वहाणारा अविरत काळ!
नाहीच पूर्ण विराम........
--- अशोक लंगडे