एक मातीची पणती
प्रज्वलित पर्णकुटीत
शक्तिभर-
पण आता
पणतीच्या जागी
प्रज्वलित सुवर्ण समई अन
प्रकाशित कांक्रीट्चा चौकोन--
दैवाचा हा कौल आहे
इथे कर्तुत्वाला मोल आहे
-पणती असेल सुवर्णाची वा मातीची
पण-प्रज्वलित वात तीच असते
दैवाला सुवर्णाच्या अस्तित्वाचे भान आहे
मातीच्या पणतीला वातेची जाण आहे
--- अशोक लंगडे