काजव्यांचे रोप पेरुन
घेवु पहातो पीक चांद्ण्यांचे
पण फ़ुलली असते निराशाच
निष्क्रीय गाजर गवतासारखी

पेट्ले असते वॆशाख वणवे मनात
उरी वॆशाख घेवुन वाट पहातो
आषाढाची-

आषाढ येतो अन निघुन जातो
पण तेव्हा,
डोळेच झालेले असतात रस्ता
आणि, तेव्हाही -

काळोखाचे धागे विणत
पिंजत असतो सूर्य

--- अशोक लंगडे