‘कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा... आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो.....

तुमच्याकडे पैसा असेल आणि तुम्ही भोळे असाल तर दुनिया तुम्हाला लुटायलाच बसली आहे... उजेडात चालताना सहाय्य करण्यासाठी भेटणारे अनेकजण असतात..... नाहीतर हल्ली उजेडातून अंधारात ढकलणारे लोक खूप आहेत... खोट्या आशा दाखवून आणि खोटेपणाने तुम्हाला फक्त आणि फक्त फसवण्याचाच हेतु आसणारे खूप आहेत.. पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देणारे आहेत.....सुर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.... धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही ...जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही... इथे आपल्याला माणूस होता यायल हवं जग जिंकता आल नाही तरी चालेल पण कोणाचं नुकसान करून वाटोळ करून कमावलेले धन कधीही साथ देत नाही... ते आजारपण, मानसिक त्रास, शारीरिक त्रास नाहीतर मुलाबाळांना दुःखी ठेवत... आणि या जन्मात सुटला तर पुढच्या जन्मात सोडत नाही या आणि अशा अनेक रूपात बाहेर येत असते....म्हणून चुकीच्या मार्गाने कमवलेले धन कधीही सुख आणत नाही....

-- आनंद पिंपळकर