या जीवनात सार् या इच्छा-आकांक्षा यांचं हेच होतं. त्यांची स्वप्नं उराशी बाळगुन असेच सुबक देव्हारे आपण मनात तयार करीत

राहतो; पण त्या इ च्छा आकांक्षा साकार होतात, तेव्हा त्यांनी वेगळाचा आकार धारण केलेल असतो. त्यांच्यासाठी मनात कोरलेले देव्हारे पार अपुरे ठरतात. त्या देव्हार यांना शेवटी अडगळीचे स्वरुप येते.

--- राधेय - रणजीत देसाई