मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर, त्यातली सहजता. त्या सहजते मधूनच सुरक्षित पणाची साय आपोआप धरते.

साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हे. सायीखालाच्या दुधाला सायीच दडपण वाटत नाही.मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. आपल्याला लहानपणाचे आठवते त्या आधीपासूनच आपण मैत्रीत पडलेले असतो.

--- व. पु. काळे

आपण ईथून आता सात पावलं चालू. आशीर्वाद द्यायला ही आपली नवीन वास्तू आहे. पावलागनिक ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशिर्वाद मलाही सावरील.....

मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध गेतलेला नाही. मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे. सौदर्य, संगीत, सुगंध, साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायच नाही. नवर्‍याला देव वगैरे मानणार्‍यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विच्रलेले नाही. तशी नसशीलच तर उत्तम, पण असलीच तर ईतकच सांगेन की मला देव मानण्याचा प्रयत्‍न केलास तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत-नकळत होणारे अपराध क्षम्य ठरतील.

कुणाचही मन न दुखावण हिच मी देवपूजा मानतो. जीवात-जीव आसेतो मी तुला सांभाळीन.. सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा ईतकच सांगेन की आपल्या घरात, संसारात तु चिंतेत असताना मी मजेत आहे अस कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायाच म्हणजे मला पत्नी हवीच होती, मात्र पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ.

मला सखी हवी आहे ..........होशील !!!

--- पार्टनर-व. पु. काळे

प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोड आत डोकावून पाहाव. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालतान सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हव आहे, ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे, तीनुसार आपल्याला जे हव आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते.  शाणपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या औदासिंयामागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत  कुणाच्याही आशीर्वादान कोणती शांती मिळणार?

औदासिन्य नाहीस कस होणार? अहंकारान मन काठोकाठ भरलेलं असल, तर आशीर्वादान आत उतरायचं कस? भांड रिकाम हव, तरच ते भरता येईल.

कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत जे सांगितल ते, "जो हसला, तो अमृत प्याला" हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला, रे, संपला की स्वास्थ्य  आणि आनंदाव्यातिरिक्त उरत काय?

आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो.  हा अडथळा दूर होण् महत्वाच. कबीर ह्यालाच सहजयोग म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावान व्यापून जाईल.  राहत्या वस्तुत प्रतिदिनी गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचीती येण्यासाठी मुळ अहंकार गेला नाही, तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा... सगळं व्यर्थ आहे!

माझ माझ्यापाशी .........वपु काळे

परमेश्वराने प्रत्येकाला नुसतेच डोळे दिलेले नाहीत , नजरही बहाल केली आहे .स्वतंत्र विचारशक्तीची देणगी  प्रत्येकाला दिलेले आहे .आपण दुसऱ्या माणसाकडे तो जसा आहे तसा पाहायला शिकतच नाही .ह्या संदर्भात एक हकिकत आठवते ती पुरेशी बोलकी आहे .

६५ वर्षाचा एक म्हातारा डोळे अधू झाले म्हणून एका आय स्पेशॅलिस्टकडे गेला . डॉक्टरांनी त्याला सांगितलं तातडीने ऑपरेशन कराव लागेल तुम्ही वेळेवर आलात ह्यापेक्षा उशीर केला असता. तर द्रुष्टी साफ गेली असती कधी  ॲडमिट होता बोला ! म्हाताऱ्याने विचार केला तो डॉक्टरांना एवढेच म्हणाला मला ऑपरेशनची आवश्यकता  वाटत  नाही माझं आयुष्य किती उरल आहे हे मला माहित नाही जास्तीत जास्त काय होईल ? मी आंधळा होईन मला तीन मुले आहेत, तीन सुना आहेत, एक भाऊ आहे, तीन नातू आहेत, म्हणजे माझ्या घरामध्ये वीस डोळे आहेत, माझी नजर गेली तरी चालेल मला ऑपरेशनच्या वेदना नकोत. त्यानंतर अकस्मात रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली वाडा जुन्या बांधणीचा होता घरातली एकूण माणसे धावत पळत वाडयाबाहेर पडली आंधळा म्हातारा घरातच अडकला बाहेर पडलेल्या माणसांना याची जाणीव उशिरा झाली एकानेही आत जाण्याची हिमंत केली नाही संपूर्ण वाडा परिचयाचा असल्यामुळे कशीतरी वाट शोधत म्हातारा वाडयाच्या बाहेर आला त्यावेळी त्याला समजलं स्व:ताची वाट शोधायची असेल तर त्यासाठी स्वत:चेच डोळे लागतात.

व. पु . महोत्सव - .वपु काळे