सुप्रिया जोशी नेहमीच वेगळ्या वाटेवरचे लिहितात.त्यांचे पहिले पुस्तक जगातल्या सहसा लोक जिथे जात नाहीत
अशा आफ़्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील विचित्र जागांबद्दल प्रवासवर्णन होते. दुसरी कादंबरी ही मराठीत सहसा न लिहिल्या जाणार्या समलैंगिकतेच्या विषयावर होती. त्यांची ही तिसरी कादंबरी तशीच वेगळी गूढ कादंबरी आहे. मनोविकारांच्या आजवर न लिहिलेल्या विषयावरची ही कादंबरी वेगळे काही शोधणार्या वाचकांसाठी आहे.