आयुष्याला जीवन का म्हणतात ? कारण, जीवन म्हणजे पाणी.आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वहात राहिले, तरच ते जीवन.
साचून राहिले तर ते डबके जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे तिचा कितीही आस्वाद गया .कंटाळा कधीच येत नाही आणि तृप्ती होत नाही. रोज सकाळी सूर्याबरोबर नवीन जीवन जन्माला येते.चिरंतन नाविन्य म्हणजे जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही.
कऱ्हेचे पाणी - प्र. के .अत्रे